फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून ते १५५ स्थानावर पोहोचले आहेत.
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची १५६व्या स्थानावर घसरण झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या नेपाळविरुद्धचा सामना गोलविरहित झाला होता. यापुढे भारताचा सामना ८ सप्टेंबरला इराणविरुद्ध बंगळुरू येथे होणार
आहे.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.