वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com

पंचकर्मे अनेक कारणांसाठी केली जातात. रोगानुसार-सर्व रोगांवर अवस्थानुसार विविध पंचकर्मे सांगितली आहेत. उदा- दमासारख्या विकारात वमन.

Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?

ऋतूनुसार- ठरावीक ऋतूमध्ये वातावरणाच्या बदलामुळे शरीरातील ठरावीक दोष वाढतात. वेळोवेळी ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी काही कर्मे केली जातात. उदाहरणार्थ वसंत ऋतूमध्ये वाढलेला कफ काढून टाकण्यासाठी वमन, वर्षां ऋतूमध्ये वातासाठी बस्ती आणि शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन केले जाते. दर वर्षी ऋतूनुसार पंचकर्म करणे म्हणजे एक प्रकारे शरीराचे सव्‍‌र्हिसिंग करण्यासारखेच आहे.

गर्भधारणेपूर्व-गर्भधारणेत अडचण येत असल्यास किंवा उत्तम संतती निर्मितीसाठी कुटुंबाचे नियोजन करत असताना पंचकर्म करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.

पंचकर्माचे फायदे-पंचकर्म केल्यामुळे भूक चांगली लागते, पचन सुधारते, शरीराला आणि मनाला स्वस्थता मिळते, मन आणि बुद्धी आपापल्या कार्यामध्ये उत्कर्ष करतात, शरीराचा वर्ण, कांती यांमध्ये सुधारणा होते, कार्यशक्ती अर्थात स्टॅमिना वाढतो, वृद्धावस्था लवकर येत नाही, निरोगी असे दीर्घायुष्य मिळते व जुनाट व्याधी कायमची नष्ट होतात.

पंचकर्मे कोणी करू नयेत?

पंचकर्मे उपचार करत असताना आणि पंचकर्मे झाल्यानंतर जे रुग्ण आहार-विहाराचे पथ्य पाळू शकणार नाहीत, अतिधाडसी किंवा अतिघाबरट रुग्ण, ज्या रुग्णांचे बल कमी झाले आहे, असाध्य रोग पीडित रुग्ण, ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना खूप थकवा आहे असे रुग्ण यांनी पंचकर्मे करू नयेत अथवा गरज असल्यास तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली करावीत.

लक्षात ठेवा, पंचकर्मे ही जाता-येता करण्याची गोष्ट नाही. उत्तम वैद्याबरोबरच उत्तम रुग्णाची साथही पंचकर्मे करताना गरजेची असते. पंचकर्मे करताना दिलेल्या सूचनांचे नीट पालन झाले नाही तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ  शकतात. त्यामुळे पंचकर्मे ही नेहमी तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने आणि त्यांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळूनच करावीत.