अमेय वाघ, अभिनेता

महाविद्यालयीन जीवनातून केवळ करिअरलाच दिशा मिळते असे नाही तर, यातून प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक समृद्ध बनत जाते, माणूस म्हणून त्याच्या जडणघडणीला आकार मिळतो. हे होत असताना येणारे गोड-कटू अनुभव, प्रसंग, घटना आयुष्यभर साथसंगत करतात. या अनुभवातून धडे गिरवून आपापल्या क्षेत्रात मैलाचे दगड गाठणाऱ्या नामवंतांच्या कॉलेज दिवसांतील आठवणींचा कोलाज त्यांच्याच शब्दांत मांडणारे हे साप्ताहिक सदर..

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

बालपण, तारुण्य, संसार, म्हातारपण हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील ‘सेक्शन’ असतात. पण यातील सर्वात सुवर्णकाळ असतो तो तारुण्यातला आणि तो सर्वाधिक महाविद्यालयातच घालवला जातो. पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी माझा सुवर्णकाळ घालवला.

कॉलेजमधला पहिला दिवस माझ्या चांगलाच स्मरणात आहे. कलाकार म्हणून दिशा देणारा तो दिवस होता. पहिल्याच दिवशी वर्गात नाटकाचे सीनियर्स आले आणि त्यांनी ‘कोणाला नाटकात काम करायची इच्छा आहे का?’ अशी विचारणा केली. त्या वेळी मी हात वर केला आणि नाटकाच्या तालीम हॉलमध्ये दाखल झालो. या हॉलमध्ये आणि कॉलेजकट्टय़ावर मी नेहमी पडीक असायचो. अमेय वाघ कुठे असेल तर या दोनपैकी एका ठिकाणी, इतकं ते घट्ट समीकरण होतं. कॉलेजच्या सांस्कृतिक चळवळीतूनच कलाकार घडत जातो, मोठा होत जातो. मीदेखील या सांस्कृतिक चळवळीत मोठा सहभाग घेतला. कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी असताना अनेक गोष्टी मी पुढाकार घेऊन करवून घेतल्या, केल्या.

कॉलेजच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास सगळ्या नाटय़स्पर्धात माझा सहभाग असे. याचाच एक किस्सा मोठ रंजक आहे. बारावीत गेल्यानंतर सगळेच कलाकार ‘या वर्षी नाटकात काम करायचं नाही. अभ्यासावर लक्ष द्यायचं,’ असा निर्धार करतात. मीही तसंच ठरवलं आणि अगदी परीक्षेपर्यंत पाळलं. पण ऐन परीक्षेच्या आधी एका नाटकातील चांगली ऑफर मला आली. कॉलेजने बसवलेल्या नाटकातील मुख्य भूमिका करणारा कलाकार ऐनवेळी आजारी पडला. नाटकाच्या दिग्दर्शकाने मला विचारणा केली आणि मी लगेच होकारही कळवला. नाटकाचा प्रयोग परीक्षेच्या दोन दिवस आधी होता. मला संहितेची, भूमिकेची अजिबात माहिती नव्हती. तरीही ऐनवेळी जाऊन दोन तास सराव केला आणि त्याचदिवशी नाटकाचा प्रयोगही केला. तो यशस्वीही झाला. पण परीक्षेपर्यंत नाटक न करण्याचा माझा निर्धार मात्र निष्फळ ठरला.  कॉलेजच्या कट्टय़ावर जितकी मस्ती, थट्टा, मज्जा केली जाते तितकी कुठेच होत नाही. मी आणि निपुण धर्माधिकारी कॉलेजपासूनच मित्र. सध्या आम्ही जो काही कल्ला करतोय तो कॉलेजच्या दिवसापासूनचा. कॉलेजातली आणखी एक आठवण म्हणजे, आमच्या कॉलेजच्या बाहेर खाण्यापिण्याच्या टपऱ्या होत्या. तेथील तवाराइस, कच्ची दाबेली, पावपॅटिस असे एकाहून एक पदार्थ आम्ही फस्त करायचो. पण त्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे मोजकेच असायचे. मग या पैशांची जमवाजमव करण्यासाठी आम्ही कॉलेज कट्टय़ावर काही तरी वेगळं करायचो. म्हणजे कुठला तरी ‘सीन’ (प्रसंग) करायचा, एखाद्या कलाकाराची मिमिक्री करायची, कधी डान्स तर कधी गाणी गायची. अशा मनोरंजनातून आम्ही पैसे गोळा करायचो. प्रत्येकाकडून एक-एक, दोन-दोन रुपये मिळायचे. त्यामुळे अभिनयाचं गाठोडं कॉलेजमधूनच पक्क होत गेलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

कॉलेजच्या कट्टय़ावरील या नखऱ्यांतूनच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याच कट्टय़ावर माझ्या आवडत्या मैत्रिणीने मला प्रपोज केलं. ‘मला तू आवडतोस. तुला आवडेल का मला डेट करायला?’ अशी थेट मागणी तिनं मला घातली होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून लाजरी अमेय वाघ माझी सहचारिणी आहे.

कॉलेजमधल्या आठवणी खूप आहेत. कॉलेजातला शेवटचा दिवसही आठवतोय. नाटकाच्या ‘कल्चरल’ ग्रूपमधील मुलांनी मिळून आमच्यासाठी ‘सेंडऑफ’ म्हणून एक पार्टी आयोजित केली होती. तालिम हॉलमध्ये आमच्या नावाचे बोर्ड पण झळकले. विशेष म्हणजे, या बोर्डवर सर्वात आधी माझंच नाव लिहिलेलं दिसेल. हेही आनंददायक आहे.

शब्दांकन : मितेश जोशी