09 December 2019

News Flash

आलेपाक

आले- १ वाटी (किसून)

|| डॉ. सारिका सातव

साहित्य

 • आले- १ वाटी (किसून)
 • साखर- ३ वाटी
 • दूध- अर्धा कप ते पाऊण कप
 • वेलची पावडर- अर्धा चमचा
 • तूप- दोन चमचे
 • खोबरे- अर्धा वाटी (किसून)

कृती

 • आले स्वच्छ धुऊन साल काढून किसून घ्यावे.
 • किसलेले आले आण् दूध मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
 • कढईमध्ये एक चमचा तूप टाकून पातळ झाल्यावर आले आणि दुधाचे मिश्रण, साखर व खोबरे एकत्र करावे.
 • मंद आचेवर ढवळत राहावे.
 • घट्ट होत आल्यानंतर वेलचीपूड टाकावी.
 • ताटाला तूप लावून तयार झालेला गोळा ताटात घेऊन थापावा
 • त्यानंतर अर्धा ते एक इंचाच्या वडय़ा पाडून घ्याव्यात.
 • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

वैशिष्टय़े

 • आबालवृद्धांसाठी उपयुक्त
 • सतत सर्दी, खोकला, कफ असणाऱ्यांना तसेच न्युमोनिया, डांग्या खोकला, अ‍ॅलर्जी, सायनसचा त्रास असणाऱ्यांना उपयुक्त.
 • घट्ट कफ असणाऱ्यांना विशेष उपयुक्त.
 • थंडी व पावसाळय़ात नियमित वापरू शकता.

First Published on July 23, 2019 2:44 am

Web Title: alepak mpg 94
Just Now!
X