डॉ. सारिका सातव साहित्य * हिरवा वाटाणा- दोन वाटी * बटाटे- २ * पनीर- ३० ते ४० ग्रॅम * मसाला, मीठ- चवीनुसार * गव्हाचे पीठ- तीन वाटी * तेल कृती * सोललेला हिरवा वाटाणा, बटाटा, पनीर हे सारणासाठी वापरावे. * वाटाणा, बटाटा, पनीर हे मसाला, मीठ घालून सुक्या भाजीप्रमाणे तयार करून घ्यावे. * गव्हाचे पीठ मळून छोटय़ा पुऱ्यांप्रमाणे लाटून घ्यावे. * वरील सारण त्यात भरून करंजी प्रमाणे आकार द्यावा. * या करंज्या तळून घ्याव्यात किंवा ओव्हनमध्ये बेक कराव्यात. विशेषत: * लहान मुलांसाठी उत्तम नाश्ता. * डब्याला नेण्यासाठी उत्तम पदार्थ. * आवडीप्रमाणे इतर भाज्या त्यात टाकू शकता. * तळण्याऐवजी बेक केले तरी उत्तम. * प्रथिने, ब जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ जास्त * मैद्याऐवज गव्हाचे पीठ वापरल्याने अतिशय आरोग्यदायी