05 August 2020

News Flash

पूर्णब्रह्म : व्हेगन व्होल व्हीट बिस्कीट

प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बिस्किटे तांबूस रंग होइपर्यंत बेक करा- म्हणजेच ८ ते १० मिनिटे.

डॉ. मानसी पाटील

साहित्य

२ कप गव्हाचे पीठ, ४ चमचे बेकिंग पावडर, पाऊण चमचा पिठीसाखर, पाव कप नारळ तेल, १ कप बदामांचे दूध

कृती

ओव्हन ४५० डिग्री फॅ. (२३० डिग्री सेल्सियस) तापमानाला प्रीहीट करा. एका वाडग्यात पीठ, बेकिंग पावडर, पिठीसाखर आणि मीठ एकत्र करा. एक पेस्ट्री कटर किंवा चाकूला नारळतेल लावून मिश्रण कोबी क्रम्ब्स(Crumbs) सारखी तयार करा व मिश्रणात बदामाचे थोडे-थोडे दूध घालून कणीक तयार करा. थोडीशी कणीक बाहेर काढा; ८ ते १० वेळा हलक्या हाताने मिक्स करा. बेकिंग शीटवर बिस्किटे लावा. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बिस्किटे तांबूस रंग होइपर्यंत बेक करा- म्हणजेच ८ ते १० मिनिटे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:54 am

Web Title: amazing vegan whole wheat biscuits recipe zws 70
Next Stories
1 आरोग्यदायी संक्रांत
2 पूर्णब्रह्म : रवा दोडाक
3 उपचारपद्धती : होमिओपॅथी
Just Now!
X