‘अ‍ॅम्ब्रेन’चा नवा फिटनेस बँड

अ‍ॅम्ब्रेन या कंपनीने ‘एएफबी ३८’हा नवीन स्मार्ट फिटनेस बँड भारतात आणला आहे. या फिटनेस बँडमध्ये एलसीडी कलर डिस्प्ले असून तो प्रखर सूर्यप्रकाशातही व्यवस्थित पाहता, वाचता येतो. यामध्ये ‘हार्ट रेट मॉनिटर’ पुरवण्यात आला असून अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर, पेडोमीटर, कॅलरी इत्यादी आरोग्यविषयक तपशील तुम्हाला हा बँड पुरवतो. यातील बॅटरी सात दिवस व्यवस्थित काम करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. हा बँड पाण्यात दीड मीटर खोलपर्यंत गेल्यानंतरही व्यवस्थित काम करू शकतो. स्मार्टफोनशी कनेक्ट केल्यानंतर तुम्ही मोबाइलवरील विविध सूचना या बँडच्या मदतीने पाहू शकता.

‘सॅमसोनाइट’चे स्मार्ट लगेज

ग्राहकांशी हुशारीने संवाद साधू शकतील अशा नव्या पिढीच्या प्रवासी सूटकेसची निर्मिती करण्यासाठी सॅमसोनाइट आणि पॅनासॉनिक एकत्र आले आहेत. आजच्या स्मार्ट प्रवाशांना विना-कटकटीचा प्रवास करता यावा यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय-योजना देण्याकरिता सॅमसोनाइटच्या ‘ईव्हीओए टेक’ या नव्या उत्पादनात पॅनासॉनिकचा सिकिट ब्लूटूथ ट्रॅकर देण्यात आला आहे ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सामान सहजतेने ओळखता आणि शोधता येईल.  पॅनासॉनिकचा सिकिट ब्लूटूथ ट्रॅकर असणारी सॅमसोनाइट ब्लूटूथ ५.० वर आधारित १४ विविध कार्य पार पाडतो. नावीन्यपूर्ण वैशिष्टय़ांमध्ये ग्राहकांना त्यांचे सामान जवळपास आहे ते समजावे यासाठी सेपरेशन इंडिकेटर आहे आणि ज्या क्षणी ते त्यांच्या सामानापासून दूर जातील त्या क्षणी त्यांना त्याची माहिती मिळेल. बाय-डिरेक्शनल ट्रॅकिंग वैशिष्टय़ामुळे, सिकिट ग्राहकांना त्यांचे सामान शोधायलाच मदत करत नाही तर, ट्रॅकरवरील बटण केवळ दोनदा दाबून त्यांचा फोनदेखील शोधून देते. प्रॉक्सिमिटी गायडन्स ही ग्राहकांना त्यांच्या सामानाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करते आणि फाइंड युवर लगेज त्यांना त्यांच्या अ‍ॅपवरील बझ बटण दाबून त्यांचे सॅमसोनाइट लगेज सहजपणे ओळखण्यासाठी मदत करते.

‘रॅपो’चा नवा कीबोर्ड-माऊस

वायरलेस संगणकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘रॅपो’ने ‘९३०० एम मल्टीमोड वायरलेस कीबोर्ड आणि ऑप्टिकल माऊस’ ही संयुक्त उत्पादने बाजारात आणली आहे. या कीबोर्डचे वैशिष्टय़ म्हणजे तो एकाच वेळी चार उपकरणांना जोडता येऊ शकतो. तर माऊस तीन उपकरणांना एकाचवेळी जोडता येतो. त्यामुळे एकाच कीबोर्ड व माऊसच्या साह्य़ाने तुम्ही वेगवेगळ्या संगणकांना किंवा लॅपटॉपला हाताळू शकता. कीबोर्डमध्ये ‘३ए’ आकाराच्या दोन बॅटऱ्या बसवल्यावर तो एक वर्षभर व्यवस्थित काम करतो व माऊससाठी एका ‘३ए’ आकाराच्या बॅटरीची गरज असते, असा कंपनीचा दावा आहे. कीबोर्डच्या बांधणीचे वैशिष्टय़ म्हणजे तो अल्युमिनियमचा वापर करून बनवण्यात आला असून तो जेमतेम पाच मिमी इतक्या जाडीचा आहे. त्यामुळे अतिशय कमी जागेतही तो ठेवता येतो. ही दोन्ही उत्पादने ब्लूटुथ ३.० व ४.० वर काम करतात.

किंमत : ३४९९ रुपये

‘किंगसॉफ्ट ऑफिस’ भारतात दाखल

आतापर्यंत स्मार्टफोनवर सर्रास वापरले जाणारे किंगसॉफ्ट कंपनीचे डब्लूपीएस ऑफिस सॉफ्टवेअर आता संगणकासाठीही उपलब्ध झाले आहे. ‘किंगसॉफ्ट ऑफिस’ने नुकतेच ‘डब्लूपीएस ऑफिस २०२०’ हे सॉफ्टवेअर भारतीय बाजारात आणले आहे. डब्लूपीएस ऑफिस हे हलके, मुख्य धारेतील सर्व ऑफिस फॉरमॅटशी सुसंगत, सर्व प्रमुख प्लॅटफॉम्र्सवर चालू शकणारे आणि क्रॉस-डिव्हाइस सिंक्रोनायझेशनची क्षमता असलेले आहे. या सूटमध्ये पूर्व-विकसित टेम्पलेट्सची भव्य अशी विनामूल्य लायब्ररी असून टॅबच्या धर्तीवर सूचक इंटरफेस असल्यामुळे वापरकर्त्यांना स्वत:ची वेगळी शैली दाखवून देणारे परिपूर्ण अशी कागदपत्रे जलदगतीने आणि सोप्या पद्धतीने तयार करणे शक्य होते. डब्लूपीएस ऑफिस २०२० हे मॅक, विंडोज, लिनक्स, आयओएस आणि अँड्रॉइडसारख्या मुख्य धारेतील सर्व ऑपरेटिंग सिस्टिम्ससाठी ऑनलाइन उपलब्ध आहे.

‘इन्फिनिक्स’चा ‘हॉट ८’

‘इन्फिनिक्स’ कंपनीने आपल्या ‘हॉट’या मालिकेत ‘हॉट ८’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हॉट ८ आधीच्या आवृत्तींपेक्षाही अद्ययावत वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर क्वेत्झल सायन आणि कॉस्मिक पर्पल रंगात उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची मूळ किंमत ७९९९ रुपये इतकी असली तरी येत्या ३० ऑक्टोबपर्यंत तो ६९९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘अँकर’चा यूएसबी वॉल चार्जर

अँकर या तंत्रज्ञानामधील जागतिक आघाडीच्या कंपनीने ६ यूएसबी पोर्टस् असलेला पॉवरपोर्ट वॉल चार्जर सादर केला आहे. जलद चार्जिग तंत्रज्ञान असलेल्या या अल्ट्रा शक्तिशाली चार्जरमध्ये ६० वॉट्सची शक्ती आहे. हा चार्जर ६ पोर्टसच्या माध्यमातून एकाच वेळी विविध उपकरणांना चार्जिगची सुविधा देतो. ‘अँकर पॉवरपोर्ट ६’ हा बाजारपेठेतील सर्वात कॉम्पॅक्ट मल्टी-पोर्ट चार्जर्सपैकी एक आहे. पॉवरपोर्ट ६ प्रगत चार्जिग तंत्रज्ञानासह सर्व डिवाईसेसना फुल स्पीड चार्जिग देतो. अँकरची प्रमुख वैशिष्टय़े पॉवरआयक्यू व व्हॉल्टेज बूस्ट एकत्रितपणे प्रतिपोर्ट २.४ अ‍ॅम्पियर्सपर्यंत किंवा एकूण १२ अ‍ॅम्पियर्स गतीमध्ये जलद चार्जिग देण्याची खात्री देतात.  

किंमत : ३४९९ रुपये