23 September 2020

News Flash

नवलाई : ‘रिअलमी’चा चौकॅमेरा

‘रिअलमी ५प्रो’ या फोनमध्ये ८+४८+२+२ असे चार बॅक कॅमेरे असून पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘रिअलमी’चा चौकॅमेरा

भारतात झपाटय़ाने प्रसिद्ध होत असलेल्या ‘रिअलमी’ या कंपनीने चार कॅमेरे असलेले ‘रिअलमी ५’ आणि ‘रिअलमी५ प्रो’ असे दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यापैकी ‘रिअलमी ५’मध्ये ८+१२+२+२ अशा विविध वैशिष्टय़े असलेले चार कॅमेरे मागील बाजूस देण्यात आले असून पुढील बाजूस १३ मेगापिक्सेलचा ‘एआय’ कॅमेरा पुरवण्यात आला आहे. यामध्ये ६.५ इंची स्क्रीन, मिनी ड्रॉप फुल डिस्प्ले, ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी, अँड्रॉइड ९.० अशी वैशिष्टय़े आहेत. हा फोन ३ जीबी रॅम + ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज, ४ जीबी+६४ जीबी आणि ४जीबी+१२८ जीबी अशा तीन श्रेणींमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत अनुक्रमे ९९९९, १०९९९, ११९९९ रुपये इतकी आहे.

‘रिअलमी ५प्रो’ या फोनमध्ये ८+४८+२+२ असे चार बॅक कॅमेरे असून पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याखेरीज यामध्ये ‘रिअलमी५’सारखीच वैशिष्टय़े आहेत. हा स्मार्टफोन तीन श्रेणींमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत १३,९९९ ते १६,९९९ रुपये इतकी आहे.

इन्फिनिक्सच्या ‘एस४’ची दुसरी आवृत्ती

इन्फिनिक्स या स्मार्टफोन ब्रॅण्डने ‘एस४’ या स्मार्टफोनची दुसरी आवृत्ती ‘एस४ २.०’ भारतात आणली आहे. चार जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सेल फंट्र कॅमेरा, १३+२+८ मेगापिक्सेलचा ट्रिपल रीयर कॅमेरा, अ‍ॅण्ड्रॉइड ९.०, फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत.

* किंमत:  ८९९९ रुपये.

‘एफ अ‍ॅण्ड डी’चा ‘फ्लोअर स्टॅण्डिंग स्पीकर’

‘एफ अ‍ॅण्ड डी’ या ब्रॅण्डने नवीन मल्टिमीडिया टॉवर स्पीकर भारतीय बाजारात आणला आहे. लाकडी रचनेने बनवण्यात आलेल्या या स्पीकरला आकर्षक लुक देण्यात आला आहे. तिन्ही बाजूंनी आवाज देणारी डिझाइन प्रत्येक चॅनेलसाठी १० इंची सबवूफर, १ इंची सिल्क डोम ट्विटर आणि ५.२५ इंची वूफरचा उपयोग करते. ज्यामधून सुस्पष्ट व दुमदुमत्या आवाजाची खात्री मिळते. ३०० डब्ल्यू आरएमएस असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान सुस्पष्ट व सर्वोत्तम म्युझिकसह आणि परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभवासह दूपर्यंत स्पीकर कव्हरेज देते. हा स्पीकर ऑप्टिकल इनपुटच्या माध्यमातून डिजिटल ऑडिओ सपोर्टसह रिमोट कंट्रोलसह नियंत्रित करता येतो, ज्यामुळे साऊंडवर दूरूनच नियंत्रण ठेवता येते. वायरलेस कराओके माइक असलेला हा स्पीकर तुमचा स्वत:चा कराओके स्टुडिओ तयार करण्याची सुविधा देतो.

* किंमत : २४९९९ रुपय

‘साऊंडकोअर’चे ‘लाइफ २

अँकरच्या साऊंडकोअर या तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनीने नवीन ‘लाइफ २ नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्स’ सादर केले. हे हेडफोन्स अनलिमिटेड म्युझिक आणि उत्तम आरामदायी अनुभव देतात. भावी पिढीसाठी डिझाइन करण्यात आलेले हे हेडफोन्स कोणत्याही वातावरणामध्ये सुस्पष्ट व विशाल आवाजाची खात्री देतात. तसेच यामधील टिकाऊ  साहित्यासह ३० तासांपर्यंत टिकणाऱ्या बॅटरी क्षमतेमुळे तुम्ही कामगिरीबाबत तडजोड न करता मुक्तपणे वायरलेस संगीताचा आनंद घेऊ  शकता. लाइफ २ हेडफोन्स वजनाने हलके व आरामदायी आहेत आणि दिवसभरात म्युझिकचा आनंद देण्यासाठी परिपूर्ण आहेत. या हेडफोनमध्ये उच्च-कार्यक्षम ४० मिमी ड्रायव्हर्स आहेत. हे ड्रायव्हर्स सुस्पष्ट, अचूक व विशाल आवाजासह विनाव्यत्यय संगीताचा आनंद देतात. हे उत्पादन भारतातील प्रमुख रिटेल आणि ई-कॉमर्स स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

* किंमत : ९९९९ रुपये

टीसीएलचा स्मार्ट टीव्ही

‘टीसीएल’ने ४के एआय टीव्हीची ‘पी८’ ही नवी श्रेणी भारतात आणली आहे. गुगलच्या अँड्रॉइड ९.० या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित हा टीव्ही आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देतो, असा कंपनीचा दावा आहे. यातील विशेष तंत्रज्ञानामुळे टीव्हीच्या माध्यमातून ‘स्मार्ट होम’मधील विविध स्मार्ट उपकरणे हाताळण्याची सुविधाही यामध्ये पुरवण्यात आली आहे. नवीन टीव्ही एआयमुळे रिमोट कंट्रोलचा वापर न करता गॅझेटसारखे अखंडपणे कार्य करतो. एआय फेअरफील्ड तंत्रज्ञानाद्वारे, सर्वात समावेशक टीव्ही पाहण्याचा अनुभव देण्यासाठीटीव्ही प्रतिमा आणि साऊंड इंजिनीअरिंग वर्धित करतो. यासोबतच, स्पोर्टसं मोड वैशिष्टय़ासह, टीव्ही चालू असलेल्या सामन्याचे आकलन वाढवितो वएक अत्यंत गतिमान आणि चुरशीचा खेळ पाहण्याचा अनुभव देतो.

किंमत :  २७९९० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:14 am

Web Title: another version of infinixs s abn 97
Next Stories
1 परदेशी पक्वान्न : कुर्जेत रोस्टी विथ सार क्रीम
2 निर्धारात संयम हवा..
3 मला सर्वागाने घडवणारी वास्तू
Just Now!
X