शुभा प्रभू साटम

साहित्य

सफरचंद, अर्धी वाटी बदाम, बटर, लसूण, व्हेज स्टॉक, मीठ, मिरपूड, ड्राय हर्ब्ज आणि चिली फ्लेक्स.

कृती

बदाम कोमट पाण्यात भिजवून सोलून मग अगदी गुळगुळीत वाटून घ्या. बटर गरम करून त्यात लसूण आणि सफरचंदाच्या फोडी परता. त्यामध्ये व्हेज स्टॉक, मीठ, मिरपूड घालून शिजवून घ्या. हे शिजलेलं मिश्रण मिक्सरला वाटून घेऊन त्यात बदामाचे गुळगुळीत वाटण मिसळा. हब्र्ज घालून एक उकळी काढा. प्यायला घेताना आवडत असल्यास चिली फ्लेक्स घालून घेऊ शकता. व्हेज स्टॉकऐवजी चिकन स्टॉकही घालू शकता. तसेच आवडत असेल तर नुसत्याच बदामाऐवजी समप्रमाणात काजू आणि खोबरेही वापरू शकता.