साहित्य :

२ सफरचंद, एक जुडी सेलरी, पाव कप बेदाणेड्रेसिंगकरिता पाऊण कप दही, २ चमचे संत्र्याचा रस, १ चमचा भरून संत्र्याच्या सालांचा चुरा, १ चमचा मध, थोडीशी दालचिनी.

कृती

सफरचंद धुऊन आणि साले काढून घ्यावी. त्याचे पातळ काप करावेत. एका बाऊलमध्ये सफरचंद, सेलरीचे तुकडे आणि बेदाणे एकत्र करून घ्यावेत. एका लहान वाडग्यात ड्रेसिंगचे साहित्य एकत्र करून घ्यावे.

ज्या भांडय़ात तुम्ही सॅलड देणार आहात, त्यामध्ये आधी सफरचंदाचे काप, सेलरीचे तुकडे आणि बेदाणे घालावे. त्यावर ड्रेसिंग ओतावे. छान एकत्र करून खायला द्यावे.

nilesh@chefneel.com