फूड प्रोसेसर हे स्वयंपाकघरातील परिपूर्ण उपकरण आहे. भाजी चिरणे, भाज्यांचे काप करणे, फळांचा रस काढणे, पीठ मळण्याच्या उपकरणांद्वारे सोपी झाली आहेत. मात्र रोजच्या वापरातील उपकरणांची स्वच्छता आवश्यक आहे.

*      तुम्हाला जर आरोग्यदायी, चवदार जेवण हवे असेल तर फूड प्रोसेसरची वेळच्या वेळी साफसफाई करणे गरजेचे आहे. कारण फूड प्रोसेसरचा वापर झाल्यानंतर त्यामध्ये भाज्यांचे, फळांचे, पदार्थाचे बारीक कण राहतात. ते जर साफ केले नाहीतर सडतात आणि फूड प्रोसेसरमधून दरुगधी येते.

*      फूड प्रोसेसर या उपकरणात अनेक लहान सुटे भाग असतात. हे सुटे भाग काढून फूड प्रोसेसर साफ करावा. फूड प्रोसेसरचे ब्लेड काढताना आणि साफ करताना काळजी घ्या.

*      फूड प्रोसेसरचा वापर झाल्यानंतर तात्काळ त्याचे ब्लेड साफ करा. कारण त्यामुळे त्याची धार बोथट होत नाही आणि ते खराब होत नाही. भांडी घासण्याच्या साबणाने ब्लेड साफ करू शकता. सुक्या डिश टॉवेलने ते पुसून घ्या आणि नंतरच ते फूड प्रोसेसरमध्ये बसवा.

*      फूड प्रोसेसरचे अन्य सुटे भागही काळजीपूर्वक काढून स्वच्छ करा. ते साफ करण्यासाठी कोमट पाणी आणि भांडी घासण्याच्या साबणाचा वापर करा. फूड प्रोसेसरचा वापर झाल्यानंतर तात्काळ सुटे भाग साफ करा. काही वेळाने साफ केल्यास आतमधील डाग सुकतात आणि त्याची सफाई करणे कठीण जाते.

*      फूड प्रोसेसरच्या तळाचा भाग आणि मोटरही साफ करणे आवश्यक आहे. टाकाऊ फडक्याने मोटर आणि बाजूचा भाग साफ करा.

*      फूड प्रोसेसरमधून जर दरुगधी येत असेल तर बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिश्रण फूड प्रोसेसरच्या बाऊलमध्ये १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर बाऊल साफ करा.