सध्या बहुतेक घरांमध्ये हेअर ड्रायरचा वापर होत आहे. केस सुकवण्यासाठी बहुतेक महिला हेअर ड्रायरचा वापर करतात. ओले केस सुकवणे, केसांचा भांग योग्य पद्धतीने पाडणे, केशरचना बदलणे आदी कामांसाठी हेअर ड्रायरचा वापर केला जात आहे. मात्र हेअर ड्रायरची योग्य पद्धतीने काळजी घेणेही आवश्यक आहे.

*      केस सुकवताना अनेकदा हेअर ड्रायर ओला होतो. तो सुकवल्यानंतरच ठेवून द्या. ओला हेअर ड्रायर खराब होण्याची शक्यता असते. सुक्या कपडय़ाने हेअर ड्रायर पुसून घ्या.

*      हेअर ड्रायरची सफाई करताना सर्वप्रथम त्याचा विद्युत पुरवठा बंद करा.

*      हेअर ड्रायरची वायर जर नादुरुस्त झाली असेल तर त्याचा वापर करू नका. वायरवरील आवरण निघाले असेल किंवा कुठेही फाटले असेल तर विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते.

*      हेअर ड्रायरची कळही जर नादुरुस्त असेल तरीही त्याचा वापर करू नका. ती दुरुस्त केल्यानंतरच वापर करा.

*      हेअर ड्रायरचा वापर करताना अनेकदा केसांतील कोंडा हेअर ड्रायरमध्ये अडकून राहतो. धुळीमुळेही हेअर ड्रायर खराब होतो. त्यामुळे हेअर ड्रायरची ग्रिल काढून टूथ ब्रश किंवा पेपर टॉवेलने आतील धूळ आणि कचरा पुसून घ्या.

*      हेअर ड्रायरच्या फिल्टरची सफाई करणेही आवश्यक आहे. त्यासाठी सुक्या कपडय़ाचा वापर करा. फिल्टरमधील धूळ साफ करण्यासाठी टूथब्रशचा वापर करा.

हेअर ड्रायरची बाहेरील बाजू ओल्या फडक्याने पुसून साफ करता येईल. मात्र पूर्णपणे सुकल्यानंतरच त्याचा वापर करा.