डॉ. संजीवनी राजवाडे  dr.sanjeevani@gmail.com

सध्या कोरोना विषाणूचा होणारा प्रसार आणि त्याचे गांभीर्य सर्वदूर चर्चिले जात आहे. श्वसनसंस्थेशी निगडित निर्माण होणाऱ्या लक्षणांचा समुच्चय (सर्दी- ताप- खोकला) यात आढळून येतो. प्रत्येकाच्या मनातील भीती संपवणे हे डॉक्टरांसाठी अवघड झाले आहे. खरंतर अशा रोगांचा प्रसार होतो, त्या वेळी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर ही भीती कमी होते आणि त्या संसर्गास बळी पडण्याचे प्रमाण व धोकाही खूपच कमी होतो. आपण स्वस्थ राहू शकतो.

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम!’ म्हणजेच आजारी नसलेल्या व्यक्तीने आजारी पडू नये यासाठीची उपाययोजना. यात प्रतिकारशक्ती वाढवणे हा महत्त्वाचा हेतू.

एखाद्या बाळाचा जन्म झाला की डॉक्टर लगेच सांगतात, लवकरात लवकर बाळाला बी.सी.जी.चे इंजेक्शन देऊन टाका. काय असते हे? क्षयरोगाच्या विरोधात आपली प्रतिकारशक्ती तयार व्हावी म्हणून ही लस दिली जाते. त्यानंतर पण वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर असे लसीकरण केले जाते. त्या मागील उद्देश म्हणजे विशिष्ट व्याधींचा सामना करण्यासाठी शरीरास तयार ठेवणे.

प्रतिकारशक्ती म्हणजे नेमके काय?

बहुपेशीय प्राण्यांमध्ये असणारी शरीरसंरक्षक यंत्रणा म्हणजेच प्रतिकारशक्ती. निरनिराळे जंतुसंसर्ग, व्याधी, तसेच अ‍ॅलर्जीपासून दक्ष राहणे, त्या विरोधात शरीराची लढाई सुरू करणे आणि शरीराच्या पेशींच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे प्रतिकारशक्तीचे स्वरूप आहे. कोणत्याही बाह्य़स्वरूपी द्रव्याचा/ जंतूंचा शरीरावर भडिमार झाल्यास लिंफोसाईट नावाच्या पेशी त्या विरुद्ध युद्ध पुकारतात. या पेशींच्या शक्तीच्या पलीकडे जर बाह्य़आघात असेल तर मग त्या-त्या स्वरूपी लक्षणे/ व्याधींची निर्मिती होते आणि आपले शरीर/ एखादा अवयव आजारी पडतो. आपल्या नकळत ही शक्ती सतत कार्यरत असते आणि आपल्याला वाचवण्याचा नैसर्गिक प्रयत्न करीत असते.

प्रकार

Innate- एखाद्या गोष्टीबाबत ताबडतोब किंवा काही तासांत निर्माण होणारी ही प्रक्रिया आहे. यामध्ये त्वचा, रक्तातील रासायनिक द्रव्ये, पेशी यांद्वारे हा प्रतिकार घडवून आणला जातो.

Adaptive- ही प्रक्रिया सावकाश घडून येते. या प्रथम अँटिजेनची ओळख करून घेऊन त्यानंतर त्याप्रमाणे लढाऊ  सेनानिर्मिती सुरू होते. या प्रक्रियेत त्या-त्या अँटिजेनची स्मृती जपली जाते आणि पुढील वेळी अशाच तऱ्हेचा मारा झाल्यास आधीचा एपिसोड आठवून त्याप्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीने लढाईची तयारी केली जाते. याचेही दोन उपप्रकार आहेत. अ) नैसर्गिक ब) कृत्रिम.अ) नैसर्गिक

ही प्रतिकारशक्ती तयार स्वरूपात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस मिळते. थोडक्यात मातेकडून बाळाला मिळते. गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात वारेमधून (placent) बाळाला मिळते. शिवाय स्तनपानाच्या वेळी मातेच्या दुधातून बाळाला मिळते. ही पुढे जन्मभर बाळाची नैसर्गिक प्रतिकाराची शिदोरी राहते. काही वेळा मानवाच्या (कधी-कधी घोडय़ाच्यासुद्धा) अँटीबॉडीज पीडित व्यक्तीस दिल्या जातात. जेव्हा गंभीर आजार असेल आणि शरीराच्या स्वसंरक्षण प्रक्रियेस वेळ लागणार असेल, अशावेळी ह्य़ा अँटीबॉडीज दिल्या जातात.

ब) कृत्रिम : या विविध लसींचा (Vaccine) समावेश होतो. या लसी आतडय़ांमार्फत शोषल्या जात नाहीत म्हणून इंजेक्शनद्वारे त्वचेखाली/ मासपेशींमध्ये प्रविष्ट केल्या जातात. निरनिराळे गंभीर आजार, विषसंयोग, दाहक जंतुसंसर्ग ह्य़ाकरिता लसींचा वापर केला जातो.

Inactive Vaccine- जिवाणूंचा नाश करून हे तयार केले जाते. या फ्लू, कॉलरा, हिपॅटायटिस-ए, प्लेगसाठी या लसींचा समावेश होतो. बूस्टर डोस पण लागतो.

live Vaccine- जिवाणूंची विशिष्ट तऱ्हेने वाढ करून हे तयार केले जाते. यलो फिव्हर, मिसल्स, रुबेला, मम्प्स यांसाठीच्या लसींचा यात समावेश होतो. याचा बूस्टर डोस लागत नाही.

Toxoid- धनुर्वात व घटसर्प यांसाठी ही लस दिली जाते.

Subunit Vaccine- हिपॅटायटिस-बीचे लसीकरण

प्रतिकारशक्तीची कमतरता

अगदी साध्या सर्दी-खोकल्यापासून कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिकारशक्तीची कमतरता कारणीभूत ठरते. न्यूमोनिया, मेंदूज्वर, श्वसनलिका दाह, त्वचेचे संसर्ग, पचनसंस्थेच्या तक्रारी यांना लवकर बळी पडण्याचे प्रकार अशा व्यक्तींमध्ये आढळून येतात. हल्ली प्रकृतीच्या सतत कुरबुरी असण्याचे प्रमाण सर्वच वयोगटांमध्ये वाढत असलेले आढळून येते. यासाठी आपली बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. सकस आहार, पुरेसा व्यायाम, मन:शांती व पुरेशी झोप यांची वानवा झाल्याचे दिसून येते. पेशींचे भरण-पोषण होऊन त्या आरोग्यसंपन्न व बळकट असतील तरच त्यांचे सैन्य जोरदार लढाई करू शकते. बाहेरून-कृत्रिमरीत्या तयार करण्यात येणारी औषधे ही विशिष्ट  व्याधींकरिता उपयोगी पडतात, परंतु आपल्या आत असलेल्या शक्तीला कार्यरत ठेवणे आणि त्यासाठी विशिष्ट प्रयत्न करणे आपल्या हातात असते.