माणसाच्या नितंबावर तीन प्रकारचे स्नायू असतात. ग्लुटल मसल्स नावाने हे स्नायू ओळखले जातात. खाली बसताना किंवा उभे राहताना अनेकदा हे स्नायू दुखावतात. अधिक चालल्यानंतर किंवा ट्रेकिंग केल्यानंतरही हे स्नायू दुखावतात किंवा आखडतात. आज आपण जो व्यायाम करणार आहोत, त्यामुळे या स्नायूंना बळकटी मिळणार आहे.

या व्यायामातही आपण थेराबँडचा वापर करणार आहोत. थेराबँडची टोके दोन्ही पायांना घट्ट बांधा आणि जमिनीवर झोपा. पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता थेराबँडला थोडासा ताण देऊन एक पाय दुसऱ्या पासपासून हळूहळू दूर न्या. (वैद्यकीय भाषेत याला अ‍ॅब्डक्शन म्हणतात.) काही अंतरावर ताणलेला पाय थोडा वेळ स्थिर ठेवा. पाय जास्त ताणू नका. तुम्ही पाय किती ताणता याला महत्त्व नाही. तुम्ही पाय ताणल्यानंतर तो किती वेळ स्थिर ठेवता याला महत्त्व आहे. हा व्यायाम करताना नितंबाच्या स्नायूंवर ताण येतो आणि ते बळकट बनतात.

धावताना किंवा एखादी वजनदार वस्तू उलताना ग्लुटल मसल्स

आखडतात. खुर्चीवर किंवा जमिनीवर बसताना पृष्ठभाग दुखतो. मात्र हा व्यायाम केल्याने ग्लुटल मसल मजबूत बनतात. बसताना, उभे राहाताना किंवा पळताना ते आखडत नाहीत.

dr.abhijit@gmail.com