23 April 2019

News Flash

हसत खेळत कसरत : उंच उडी

आळस नाहीसा होऊन शरीर तंदरुस्त राहते. सातत्याने उंच उडी मारल्याने पोटरीचे स्नायूही बलशाली होतात.

(संग्रहित छायाचित्र)

‘स्क्वॉट जम्प’ हा उंच उडीचा एक प्रकार आहे. या व्यायामाने शरीरातील स्नायू आणि सांधू मोकळे होतात आणि उत्साह वाढतो. आळस नाहीसा होऊन शरीर तंदरुस्त राहते. सातत्याने उंच उडी मारल्याने पोटरीचे स्नायूही बलशाली होतात.

कसे कराल?

* जमिनीवर सरळ उभे राहा. दोन्ही पायांत थोडे अंतर असू द्या, मात्र ते समांतर पाहिजेत. पाय आणि खांदे सरळ एका रेषेत आले पाहिजे.

*  आता पाय गुडघ्यामध्ये मागच्या बाजूस काटकोनात वाकवा. नितंब मागच्या बाजूस खाली घ्या. अशा वेळी तुमची छाती आणि डोके पुढच्या बाजूस सरळ पाहिजे. हात मागच्या बाजूस पाहिजे.

* मागच्या बाजूस असलेले हात आता पुढे घ्या आणि उडी मारण्यासाठी सज्ज व्हा. आता वरच्या बाजूस हवेत उंच उडी मारा. हात वरच्या बाजूस सरळ रेषेत ठेवा.

* उडी पुढच्या बाजूस वा मागच्या बाजूस गेली नाही पाहिजे. सरळ जागेवरच उडी मारली पाहिजे. उडी माराताना दीर्घ श्वास घ्या आणि खाली येताना श्वास सोडा.

*  उडी मारताना शरीर सरळ एका रेषेत आले पाहिजे. डोके, पाठ, कंबर, पाय वाकवू नये. पायाचा चवडा जमिनीच्या दिशेला पाहिजे.

*  हा व्यायाम करताना खाली पडण्याची भीती असते. त्यामुळे जमिनीवर ओलसर जागी हा व्यायाम करू नका.

* व्यायाम करण्याच्या ठिकाणी आजूबाजूला कोणतीही वस्तू नको. नाहीतर ती वस्तू लागण्याची शक्यता असते.

First Published on August 29, 2018 3:43 am

Web Title: article about exercising