माडय़ांचे स्नायू आणि नितंबाचे स्नायू मजबूत करण्यासाठी ‘साइड लंज’ हा व्यायाम केला जातो. या व्यायामामुळे मांडीच्या पुढील बाजूस असलेले स्नायू, नितंबाचे तिन्ही स्नायू आणि मांडीच्या मागील बाजूस असलेले स्नायू बळकट होतात. फॉरवर्ड लंज आणि बॅक लंज या व्यायाम प्रकारांपेक्षा साइड लंज हा वेगळा व्यायाम प्रकार असून त्यामुळे चालण्याचा समतोलपणाही वाढतो.

कसे कराल?

आता एक पाय गुडघ्यात वाकवा. ९० अंश सेल्सिअसमध्ये हा पाय वाकला पाहिजे. दुसरा पाय मात्र न वाकता सरळ पाहिजे. शरीराचा संपूर्ण भार वाकलेल्या पायावर येतो. हा व्यायाम करताना नितंब आणि मांडीवर दाब येतो.

सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. हात कमरेवर किंवा समतोल राखण्यासाठी पुढे करावे.

आता पुन्हा पाय सरळ करा आणि दुसरा पाय वाकवून हा व्यायाम करा.

व्यायामाचे फायदे

अनेक लोक मांडीच्या दुखण्याने त्रस्त असतात. अधिक चरबी वाढल्याने किंवा स्थूलता आल्याने मांडीदुखी सुरू होते. नितंबाची वाढलेली चरबीही (सॅडलबॅग्ज) यास कारणीभूत असते. साइड लंज या व्यायामाने सॅडलबॅग्ज कमी होण्यास मदत होते. या व्यायामात नितंबावर शरीराचा भार येत असल्याने नितंबाची वाढलेली चरबी कमी होते. नितंबाचे स्नायू मजबूत होतात आणि नितंबाचा आकारही सुधारतो.