24 September 2020

News Flash

हॅचबॅक की सेडान?

गाडी विकत घेताना बरेचशे ग्राहक गाडय़ांचे किमतीनुसार विभाजन करतात.

(संग्रहित छायाचित्र)

बऱ्याच वेळेस गाडी घेताना ग्राहकांना एक प्रश्न सतावतो आणि तो म्हणजे कुठल्या प्रकारची गाडी घ्यावी. लहान कुटुंब असल्यावर हॅचबॅक कार घ्यावी का सेडान हा निर्णय घेणे काही वेळेस कठीण होऊन जाते. या दोघांमध्ये काय फरक आहे? तुमच्यासाठी कोणती कार अधिक योग्य आहे हे समजून घेऊ या.

सेडान आणि हॅचबॅक हे दोन्ही प्रकार बाजारात अत्यंत लोकप्रिय आहेत. बाजारात दाखल झालेल्या नव्या कॉम्पॅक्ट सेडानने तर या दोन्हीमधील फरक जवळपास नाहीसा केला आहे. तरीही या दोन्ही प्रकारांचे समान फायदे आहेत. कारची निवड करताना आपल्यासाठी अधिक योग्य पर्याय कोणता याची ग्राहकाने दाखल घ्यावी. हॅचबॅक गाडय़ांनी भारतात सुरुवातीच्या काळात धुमाकूळ घातला. गाडीची किंमत कमी होती आणि  अ‍ॅव्हरेज जास्त होता. छोटय़ा आकारामुळे या गाडय़ांच्या पाìकगचा देखील त्रास होत नसे. शहरातील ट्रॅफिक असलेल्या रस्त्यांवर गाडी वळवण्यात चालकाची दमछाक होत नसे. यामुळे हॅचबॅक कमालीची लोकप्रिय झाली. हॅचबॅकच्या भरभराटीत मागे पडलेल्या सेडान गाडय़ांनी देखील पुन्हा एकदा बाजारात आपला जम बसवला आहे. भारतीय बाजारात हॅचबॅक आणि सेडान गाडय़ांचीच सर्वात जास्त विक्री होते. आता यामधील कोणती गाडी निवडावी हा प्रश्न आहे.

गाडी विकत घेताना बरेचशे ग्राहक गाडय़ांचे किमतीनुसार विभाजन करतात. म्हणजे सहा लाखांमध्ये मिळणाऱ्या गाडय़ा कोणत्या किंवा आठ लाखांत मिळणाऱ्या गाडय़ा कोणत्या? अशा प्रकारे कार विकत घेण्याचा निर्णय घेतला जातो. असे न करता आपल्या आवश्यकतेनुसार गाडी विकत घेण्यावर भर देणे गरजेचे आहे. याचा अर्थ सहा लाखांच्या गाडीऐवजी आठ लाखांची गाडी असा होत नाही. तुम्ही ठरवलेल्याच किमतीमध्ये गाडीचे कोणते प्रकार उपलब्ध आहेत हे पाहणे फायद्याचे ठरू शकते. रोज कामावर जाण्यासाठी तुम्हाला गाडी हवी असेल, किंवा तुमचा प्रवास शहरांतर्गत जास्त असेल तर हॅचबॅकचा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. हॅचबॅक आकाराने लहान असल्यामुळे बाहेर गाडी पार्क करताना सेडानच्या तुलनेत कमी जागा घेणार, वजन कमी असल्यामुळे गाडीचा अ‍ॅव्हरेज हा सेडानहून अधिक असणार. सेडान आणि हॅचबॅक गाडय़ांच्या पुढच्या सीट जवळपास सारख्याच असतात, त्यामुळे तुम्हाला आरामदायक प्रवास करता येईल.

जर तुम्ही शहरात प्रवास करत असाल आणि बाहेरदेखील गाडी घेऊन जात असाल तर तुमच्यासाठी सेडानचा पर्याय योग्य आहे. सेडानमध्ये तुम्हाला बूट स्पेस जास्त मिळत असल्यामुळे यात तुम्ही सामान जास्त ठेवू शकता. तुमचे कुटुंब मोठे असेल आणि महामार्गावर तुमचा प्रवास जास्त होत असेल तर तुमच्यासाठी योग्य आहे.

सेडानचे फायदे

* मोठा व्हीलबेस आणि आणि बूटच्या वजनामुळे महामार्गावर सेडान हॅचबॅकच्या तुलनेत चांगल्या प्रकारे काम करते.

*  त्यामुळे शहरी भागात आणि महामार्गावरून तुमचा प्रवास होत असेल तर सेडानचा पर्याय योग्य आहे.

*  सेडान ही हॅचबॅकच्या तुलनेत कमी आवाज करते. जर तुमचा प्रवास नियमित नसेल तरीही सेडानचा विचार केला जाऊ  शकतो.

*  सेडानची स्टायलिंग अधिक दिमाखदार असल्यामुळे तिची एक वेगळी प्रतिष्ठा असते.

हॅचबॅकचे फायदे

* जर तुम्ही पहिली गाडी घेत असाल किंवा गाडी शिकत असाल तर हॅचबॅकचा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे.

*  हॅचबॅकचे बॉनेट लहान असल्यामुळे चालकाला गाडीवर चांगले नियंत्रण ठेवता येते. त्याचप्रमाणे लहान आकारामुळे गाडी सहज मागे घेता येते.

*  बूटस्पेस कमी असल्याने हॅचबॅकचे वजन कमी असते. यामुळे इंधनाची बचत होते.

*  काही हॅचबॅकमध्ये मागील  सीट फोल्ड करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. यामुळे तुम्हाला अधिक बूटस्पेस मिळते.

*  गाडी विकताना हॅचबॅकला सेडानच्या तुलनेत चांगली किंमत मिळते.

*ल्ल  शहरातील लहान कुटुंबांसाठी हॅचबॅक अगदी चांगला पर्याय आहे. भारत आणि ब्राझीलसारख्या विकसनशील देशांमध्ये किंमत कमी असल्यामुळे सेडानहून हॅचबॅकची विक्री जास्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:45 am

Web Title: article about hatchback sedan car features
Next Stories
1 लॅण्ड रोव्हरचा थरारक अनुभव
2 सॅलड सदाबहार : ब्रोकोली  अ‍ॅपल सॅलड
3 नेत्रसुखद वास्तुशिल्पं
Just Now!
X