लाडक्या गणरायाचे मखर सजवण्यासाठी नवनवीन कल्पनांच्या शोधात आहात का? मग एक एकदम सोपी आणि तेवढीच आकर्षक कलाकृती शिकू या. पावसाळ्यात मक्याची कणसे अगदी आवडीने खाल्ली जातात. या कणसांभोवती असलेली हिरवट पाने अतिशय आकर्षक असतात. ती सामान्यपणे कचऱ्यात जातात. त्यांचा पुनर्वापर करू या..
साहित्य :
कणसाची वाळकी पाने, कापसाचे वाळके बोंड किवा चिंचेची साल, अॅक्रेलिक रंग, ब्रश व रंगकामाचे साहित्य, हिरवी क्रेप टेप, गम (फेव्हिबाँड.)
कृती
* एका आकाराची कणसाची वाळकी पाने घ्या. एका कणसाची साधारण २०-२५ पाने निघतातच.
* त्याच्या ४-५ मोठय़ा पानांचा एक फुलोरा तयार करा.
* अॅक्रेलिक रंगाने कापसाचे बोंड व चिंचेचे साल रंगवा व नीट वाळू द्या.
* कणसाच्या पानाच्या द्रोंणामध्ये हे रंगवलेले कापसाचे बोंड व चिंचेचे साल यांची आकर्षक पद्धतीने रचना करा.
* सर्व एकत्र करून गुच्छ बांधा आणि गमने चिकटवा. उरलेल्या कडा लपवण्यासाठी हिरवी क्रेप टेप गुंडाळा.
* मखराच्या वरच्या भागात ठेऊ शकता किंवा गणपतीसमोर एखाद्या फुलदाणीतही सजवू शकता.
* सेट बनवून भेटवस्तू म्हणून द्यायला वापरू शकता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2018 4:17 am