डॉ. रमाकांत देशपांडे

बदलती जीवनशैली, फास्ट फूडचा तसेच चरबीयुक्त पदार्थाचा आहारातील अतिरेक, बद्धकोष्ठता अशा विविध कारणांमुळे आतडय़ांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे कर्करोगतज्ज्ञ सांगतात. आहाराच्या चुकीच्या सवयी वाढत असलेल्या ठिकाणी आतडय़ांच्या कर्करोगाचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसते.

Do you know Swordbilled hummingbird The title bird with the longest beak in the world read about this everything
जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?

मोठे आतडे हा पचनसंस्थेतील सर्वात शेवटचा, नळीसारखा अवयव असतो. त्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला सर्व मल साठवलेला असतो. मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग हा आतडय़ाच्या आतील आवरणापासून सुरू होऊन पुढे पसरतो. काही वेळेला मोठय़ा आतडय़ामध्ये लहान गाठी दिसून येतात. त्या सुरुवातीला कर्करोगाच्या नसतात, मात्र अनेक वर्षे त्या आतडय़ामध्ये राहिल्यास त्याचे रूपांतर कर्करोगाच्या गाठींमध्ये होऊ  शकते. कोलोनोस्कोपीसारख्या वैद्यकीय चाचणीद्वारे याचे निदान होते. वेळीच निदान झाले, तर वैद्यकीय उपचारांनंतर आतडय़ांचा कर्करोग बरा होऊ  शकतो. कर्करोगाची गाठ उजव्या बाजूला आतडय़ात असेल, तर हे आतडे मोठे असल्याने गाठ खूप मोठी झाल्याशिवाय त्रास सुरू होत नाही. त्यामुळे या आजाराची लक्षणे उशिरा दिसून येतात. या प्रकारच्या कर्करोगामध्ये शौचावाटे रक्त पडून शरीरातील रक्त कमी होऊन थकवा, चक्कर येण्याचा त्रास जाणवतो. अनेकदा मोठय़ा आतडय़ामध्ये लहान लहान गाठी आढळून येतात. हे पॉलिप्स (ढ’८स्र्२) सुरुवातीस कर्करोगाचे नसतात. परंतु अनेक वर्षे तसेच आतडय़ामध्ये राहिल्यास त्याचे परिवर्तन कर्करोगामध्ये होऊ  शकते, म्हणून अनेकदा सर्जन्स कोलोनोस्कोपी करताना हे पॉलिप्स आढळल्यास काढून टाकतात. असे पॉलिप्स काढून ते तपासणीस पाठवून त्यात कर्करोग आहे का हे तपासले जाते.

लक्षणे कोणती

* थकवा, अशक्तपणा

*  शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे म्हणजे जी व्यक्ती रोज सकाळी शौचास जाते त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा शौचास जावे लागणे. अथवा दोन-चार दिवस शौचास न होणे हेही कर्करोगाचे लक्षण असू शकते.

* पोटदुखी अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास.

* वजन घटणे ल्ल  शौचावाटे रक्त जाणे

जीवनशैलीत बदल करा!

* योग्य आहार घ्यावा, ज्यात पालेभाज्या, सलाड, तंतुमय पदार्थ म्हणजे कोंडा न काढता केलेल्या चपात्या, पॉलिश न केलेले तांदूळ वगैरे अन्न घ्यावे. चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण कमी करावे, जसे की तेल, अंडी, मटण, चीज, बटर.

* पन्नाशीनंतर प्रत्येकाने दरवर्षी किंवा शौचाच्या सवयीत बदल झाल्यास आपले शौच तपास करून त्यातून रक्त जात नाही ना हे पाहावे तसेच शौचाची जागा आतून तपासून घ्यावी.

*  कुटुंबातील कोणाला मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग असेल तर खबरदारी म्हणून रक्त, लघवी, शौचाचा तपास करून घ्यावा. सोनोग्राफी, एन्डोस्कोपी जरुरीप्रमाणे कराव्या.

कोणत्या तपासण्या कराव्यात?

* कोलोनोस्कोपी (Colonoscopy)- यामध्ये एक नळी (दुर्बीण) शौचाच्या जागेमधून मोठय़ा आतडय़ापर्यंत आत टाकली जाते आणि आतडे आतून पूर्णपणे पाहून घेतले जाते. काही संशयास्पद आढळल्यास वा पॉलिप्स आढळल्यास ते काढून बाहेर घेतले जातात. पॅथॉलॉजिस्टकडून कर्करोगासाठी तपासून घेतले जातात.

* सीटी स्कॅन आतडय़ाचा कर्करोग कुठे व किती पसरलाय हा तपास केला जातो.

* बा एनिमा (Ba Enema)- बेरियम नावाचे पांढरे औषध एनिमाद्वारे मोठय़ा आतडय़ात टाकून एक्स-रे काढणे. दुर्बिणीच्या तपासामुळे हल्ली याची आवश्यकता कमी पडते.

* या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अनेक रेडिऑलॉजिकल इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात बेरिअम एनिमा, एन्डोस्कोपी, सीटी स्कॅन, व्बच्र्यअल कोलोनोग्राफी, सिग्मॉइडोस्कोपी अशा अनेक तपासण्यांचा समावेश आहे. पण या सर्व चाचण्यांमध्ये योग्य व लवकर निदान करण्यासाठी कोलोनोस्कोपी ही सर्वात श्रेष्ठ आहे.

कारणे कोणती

* बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणावाचा, बैठी जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम एकूणच

शरीरावरील चयापचय प्रक्रियेवर झाल्याचे दिसून येत आहे.

*  चरबीयुक्त घटकांचे अतिसेवनही कर्करोगास कारणीभूत ठरते. पचनक्रियेनंतर जे अंतिम घटक तयार होतात, त्यातील कार्सिनोजेनिक घटक हे कॅन्सरसाठी अनेकदा कारणीभूत ठरतात.

* आनुवंशिकरीत्या कुटुंबामध्ये आतडय़ाचा कर्करोग असणे.

* बद्धकोष्ठतेमुळे मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे इतर आजारांचा संसर्ग वाढतो, तसेच कर्करोगासाठी ते कारण ठरू शकते. शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यास त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. परत परत शौचाला जावे लागणे, काही दिवस शौचास न होणे या दोन्हीसाठी योग्य वेळी वैद्यकीय उपचार सुरू करायला हवेत. शौचावाटे रक्त पडणे, वजन अचानक खूप घटणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात सतत दुखणे, मुरडा येणे या छोटय़ा कारणांकडे दुर्लक्ष करू नये.