सहकुटुंब भटकंतीमध्ये वन्यजीव पर्यटनाचा ट्रेन्ड चांगलाच रुजला आहे. वाघ पाहण्यासाठी एप्रिल-मे हा कालावधी उत्तम. त्यासाठी नियोजन आत्तापासूनच करायला हवे. रेल्वे, विमान आणि हॉटेलबरोबरच जंगल सफारीचे बुकिंगदेखील आत्ताच करावे. हल्ली अभयारण्यातील सफारीचे बुकिंग ऑनलाइन करता येते. बहुतेक अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्पांची संकेतस्थळे आहेत. शिवाय त्या त्या राज्यांच्या पर्यटन महामंडळांच्या संकेतस्थळांवरही माहिती मिळू शकते. अनेक पर्यटन व्यावसायिक किंवा स्थानिक रिसॉर्ट चालक हे बुकिंग केव्हा सुरू होते त्यावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे ही संधी गमावणे परवडणारे नसते. अरुणाचल प्रदेशातील जंगलांत जायचे असेल तर विशेष परवानगी लागते. उत्तर आणि ईशान्य भारतात अनेक समृद्ध जंगले आहेत, मात्र ईशान्येत जाताना मे महिना टाळावा. कान्हा, बांधवगड, ताडोबा, रणथंबोर, जिम कॉर्बेट या परिचित अभयारण्यांशिवाय काही वेगळी अभयारण्येदेखील पाहता येतील.

मार्च-एप्रिल

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

* कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान, गोरुमारा राष्ट्रीय उद्यान – सिक्कीम

*  मानस व्याघ्र प्रकल्प, काझीरंगा – आसाम

*  लोकतक राष्ट्रीय उद्यान (संपूर्ण जगात केवळ ६० इतकीच संख्या असलेली थामिन जातीची हरणं येथे पाहता येतील.) – मणीपूर

एप्रिल आणि मे 

*  ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान – हिमाचल प्रदेश

*  गिर राष्ट्रीय उद्यान आणि वेलावदर वन्यजीव अभयारण्य, मरिन नॅशनल पार्क, खेजडिया अभयारण्य -गुजरात

*  सुंदरबन व्याघ्र प्रकल्प -प. बंगाल पक्ष्यांसाठी बिंसर वन्यजीव अभयारण्य -कुमाऊ