स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना होणारा धूर, वाफ आणि दुर्गंधी बाहेर जावा यासाठी चिमणीचा वापर केला जातो. चिमणीमुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि धूररहित राहते. चिमणीमुळे स्वयंपाकघरातील भिंतींना काजळीही लागत नाही. मात्र स्वयंपाकघरातील वातावरण स्वच्छ करणाऱ्या चिमणीचीही नियमित साफसफाई केली पाहिजे.

* दररोज स्वयंपाक करताना होणारा धूर, वाफ चिमणी शोषून घेत असल्याने आठवडय़ातून किमान एकदा तरी चिमणीला असणारे दिवे, डिजिटल पॅनल, फिल्टरची बाहेरची बाजू पुसून घेतल्या पाहिजेत.

kitchen cleaning tips things to avoid doing dishes
भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

* दिवे डिजिटल पॅनल पुसून घेताना त्यावर थेट क्लीनर स्प्रेचा वापर करू नका. त्याचे ओघळ खाली येतात. त्याऐवजी स्वच्छ कापडावर क्लीनर स्प्रे घेऊन त्याने पुसून काढावे.

* फिल्टर असणारी चिमणी आणि एक्झॉस्ट पाइप असणारी चिमणी असे चिमणीचे सर्वसाधारण दोन प्रकार आहेत. चिमणी कुठल्या प्रकारची आहे, त्यानुसार तिची स्वच्छता करा. आधुनिक चिमणींमध्ये ऑटो क्लीन मोड असतो. चिमणी स्वच्छ ठेवण्यास त्याची मोठी मदत होते.

* चिमणी वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत स्वच्छ करत या. धातूची चिमणी असेल तर डिश लिक्विडचाही वापर करू शकता.

* दर १५ दिवसांनी चिमणीचे फिल्टर काढून गरम पाण्याने धुवा आणि स्वच्छ पुसून लावा. त्यामुळे फिल्टरची जाळी स्वच्छ राहील.

* भांडी घासायच्या साबणाच्या पाण्यात फिल्टर एक तास ठेवा. त्यानंतर टूथब्रश किंवा स्क्रबने ते साफ करावे. चिमणीचे फिल्टर साफ करण्यासाठी व्हिनेगरचाही वापर करू शकता.

* चिमणी जर अधिक चिकट झाली असेल तर डिश लिक्विडऐवजी कॉस्टिक सोडय़ाचा वापर करू शकता.