26 October 2020

News Flash

सेल्फ सव्‍‌र्हिस : ‘मॉडय़ुलर किचन’ची देखभाल

आता त्याची जागा ‘मॉडय़ुलर किचन’ने घेतली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बदलत्या काळानुसार घरांची रचना बदलली. त्यातून गृहसजावटीचे अनेक सुंदर, उत्कृष्ट आविष्कार निर्माण झाले. पूर्वी स्वयंपाकघर म्हटले की भांडी ठेवण्यासाठी मांडणी, नेहमीची भांडी, साठवणीचे डबे असे चित्र असायचे. मात्र आता त्याची जागा ‘मॉडय़ुलर किचन’ने घेतली आहे. आधुनिक, आकर्षक आणि सुटसुटीत असलेल्या ‘मॉडय़ुलर किचन’ची देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे.

* तुमचे स्वयंपाकघर दररोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. जंतुनाशक फवाऱ्याने (स्प्रे) आणि स्वच्छ कपडय़ाने स्वयंपाकघराचा पृष्ठभाग नेहमी पुसून घ्या. स्वयंपाक घरातील सर्व भांडी, मायक्रोओव्हन, फ्रिज, गॅस शेगडी नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

* मॉडय़ुलर किचनला जर स्टीलचे सिंक असेल तर ते नेहमीच साफ करावे. नायलॉनच्या स्क्रब पॅडने ते साफ करावे. सिंकमध्ये कचरा राहू देऊ नका. कारण त्यामुळे डास आणि माश्या होण्याची शक्यता असते. सिरॅमिकचे सिंक असतील तर ते व्हिनेगरने साफ करावे.

* मॉडय़ुलर किचनमधील स्टेनलेस स्टीलची भांडी नेहमी स्वच्छ ठेवली की ती चमकदार दिसतील. भांडी आणि टाइल्स साफ करण्यासाठी बेकिंग सोडय़ाचा वापर करावा. डिशवॉशरचा वापर करून भांडी साफ करता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:25 am

Web Title: article about maintenance of modular kitchen
Next Stories
1 रंगुनी नवरंगात..
2 हसत खेळत कसरत : जागेवर पळणे
3 सकस  सूप : वाटाणा सूप
Just Now!
X