रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर ६५०

रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर ६५० ही बाइक नुकतीच अमेरिकी बाजारात दाखल झाली आहे. भारतातसुद्धा या बाइकची उत्सुकतेने वाट बघितली जात आहे. बाइकमध्ये ट्वीन पॉवर इंजिन असणार आहे. बाइकचा लुक हा एन्गफिल्डला साजेसा असा विंटेज ठेवण्यात आला आहे. बाइकला ६५० सीसीचे लिक्विड कूलेड इंजिन असणार आहे. यातून ४६ बीएचपी आणि ५२ एनएम टॉर्कची ताकद आहे. या बाइकची किंमत ३ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

काँटिनेंटल जीटी ६५०

रॉयल एन्फील्डने इंटरसेप्टरसह काँटिनेंटल जीटी ६५० देखील अमेरिकी बाजारात दाखल करण्यात आली आहे. भारतीय बाजारात जीटी ५३५ ची जागा अधिक ताकदीची काँटिनेंटल जीटी ६५० घेणार आहे. ४७ बीएचपी आणि ५२ एनएम टॉर्क क्षमतेचे इंजिन आहे. बाइकला ६ स्पीड गिअरबॉक्स आहे. बाइकची किंमत ३.५० ते ४ लाखांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

यू एम रेनेगेड डय़ुटी एस

रेनेगेड डय़ुटी एस ही स्कॅम्बलर स्टाइलच्या बाइकचा रेट्रो लुक आहे; परंतु साइड डीआरएल, इंजिन आणि इतर भागांना दिलेल्या काळ्या रंगामुळे बाइकला मॉडर्न टच मिळतो. बाइकला २२३ सीसीचे इंजिन असून १६.८ बीएचपी आणि १७ एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. बाइकची किंमत एक लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे.