News Flash

नवलाई : ‘आसूस’चा नवा गेमिंग लॅपटॉप

‘आसूस’ या कंपनीने ‘एफएक्स५०५’ आणि ‘एफएक्स७०५’ हे दोन नवीन गेमिंग लॅपटॉप बाजारात दाखल केले आहेत.

नवलाई : ‘आसूस’चा नवा गेमिंग लॅपटॉप
(संग्रहित छायाचित्र)

‘आसूस’ या कंपनीने ‘एफएक्स५०५’ आणि ‘एफएक्स७०५’ हे दोन नवीन गेमिंग लॅपटॉप बाजारात दाखल केले आहेत. हे लॅपटॉप अनुक्रमे १५.६ आणि १७.३ इंच आकाराचे आहेत. ‘इंटेल कोअर आय७’ प्रोसेसर असलेल्या या दोन्ही लॅपटॉपमध्ये ‘एन्व्हीडीया जीईफोर्स जीटीएक्स १०६०’ ग्राफिक्सची सुविधा आहे. गेम खेळण्यासाठी या लॅपटॉपमध्ये विविध आकर्षक गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या असून यातील कीबोर्डवरील कळ अधिक जलदपणे काम करते.

किंमत :  ‘एफएक्स५०५’ -७९,९९० रुपये.

‘एफएक्स७०५’ – १,२४,९९० रुपये.

‘सिस्का’चे ‘रिव्हर्ब सी२’ इअरफोन

‘सिस्का’ या आघाडीच्या कंपनीने ‘रिव्हर्ब सी२ वायरलेस इअरफोन’ बाजारात आणला आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीमुळे वापरकर्ते अख्खा दिवस या इअरफोनवरून संगीताचा आनंद घेऊ शकतात. हायडेफिनेशन स्पीकर आणि मल्टिफंक्शन बटण ही या इअरफोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. यातील इअरबड्स चुंबकीय असल्याने ते हाताळणे सोपे असते. हलक्या वजनाचे हे इअरफोन पाण्यातही व्यवस्थित काम करतात. हे हेडफोन गळ्याभोवती लवचीकपणे वापरता येतात आणि सिलिकॉन इअर जेलमुळे कानातही आरामदायीपणा मिळतो. त्यामुळे ते दीर्घ काळ वापरता येतात.

 किंमत : २८४९ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 3:16 am

Web Title: article about new gadgets 4
Next Stories
1 मस्त मॉकटेल : क्रॅम्पल कूलर
2 सेल्फ सर्व्हिस : ‘बीअर्ड ट्रिमर’ची देखभाल
3 ताणमुक्तीची तान : आनंदी राहणे ही नैसर्गिक क्रिया
Just Now!
X