मीवोफिट’चे महिलांसाठी फिटनेस गॅजेट

फिटनेस तंत्रज्ञाननिर्मितीत नव्याने पदार्पण केलेल्या ‘मीवोफिट’ या कंपनीने ‘स्लिम’ आणि ‘स्लिम+एचआर’ हे खास महिलांसाठीचे फिटनेस ट्रॅकर बाजारात आणले आहेत. आकर्षक डिझाइन, कव्‍‌र्हड ग्लास आणि वळणदार आकार असलेल्या या फिटनेस ट्रॅकरचा आकार महिलांच्या हातावर अतिशय सुबकपणे उठून दिसेल, असा आहे. ०.८७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले, सात दिवस चालू शकणारी बॅटरी, आकर्षक घडय़ाळाच्या स्क्रीन अशी या ट्रॅकरची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा याविषयीच्या तपशिलांची नोंदणी केली जाते. त्यामुळे नवोदित मातांसाठी हे ट्रॅकर अतिशय उपयुक्त आहे. याखेरीज डाएटशी संबंधित नोंदीही या ट्रॅकरमध्ये घेण्यात येतात.

किंमत : २९९० रुपये.

‘क्वांटम’चा ब्लूटुथ स्पीकर

‘क्यूएचएमपीएल’ या कंपनीने ‘क्वांटम हाय टेक’ या ब्रॅण्डअंतर्गत ‘क्यूएचएम ६२२२’ हा नवीन ब्लूटुथ स्पीकर भारतात आणला आहे. दोन हजार एमएएच क्षमतेची बॅटरी, सहा वॉटचा आरएमएस स्पीकर, कमी वजन, उच्च दर्जाचा आवाज, हॅड्स फ्री कॉलिंग, इन बिल्ट मायक्रोफोन अशी या स्पीकरची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. फूल रेंज ऑडिओ ड्रायव्हर्समुळे यातील ‘बेस’ उच्चतम पातळीवर करता येतो, असा कंपनीचा दावा आहे. यूएसबीखेरीज मायक्रो एसडी आणि ऑक्स या पर्यायांनीही हा स्पीकर जोडता येतो.

किंमत : ११५० रुपये