वैभव भाकरे

पोर्शने भारतीय बाजारात आपले पाय चांगलेच रोवले आहेत. त्यांची यशस्वी एसयूव्ही कायेनचे तीन पर्याय नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहेत. कायेन ही भारतात पोर्शच्या लोकप्रिय मॉडेलपैकी एक आहे. या नवीन मॉडेलमध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञान, आणि आरामदायी प्रवास देण्यावर भर दिला आहे. या सवारीचा दिमाख अजून दमदार करण्याकडे कंपनीने प्रयत्न केले असून ते यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

एकाच गोष्टीत अनेक सुविधा असल्याचं कोणाला नाही आवडणार? अशीच कार बनवण्याचा उद्देशाने पोर्शेने त्यांच्या कायेनचे नवीन मॉडेल बाजारात दाखल केले आहे. कायेन ही पोर्शची भारतातील एक यशस्वी एसयूव्ही आहे. कायेन, कायेन ई-हायब्रीड आणि कायेन टबरे असे तीन पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शक्तिशाली टबरे इंजिन,  रीअर-अ‍ॅक्सल स्टीअरिंग, आणि आकर्षक डिझाइन यामुळे कायेनने स्पोर्ट्स कार म्हणून आपले  स्थान अधोरेखित करते.  कायेनच्या नवी मॉडेलला अधिक आरामदायी बनविण्याकडे कंपनीने लक्ष दिले आहे. यामध्ये इंटेलिजंट असिस्टंट प्रणाली आणि प्रगत कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. ग्राहकांच्या गरजांकडे लक्ष देऊन त्यानुसार उपयुक्त बदल करण्यात पोर्शचा हातखंडा आहे. या वेळी त्यांनी हेच केल्याचे पोर्श टबरेकडे पाहिल्यास प्रकर्षांने जाणवते. विविध सोयी आणि आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असलेली कायेन ही परिपूर्ण स्पोर्ट्स कार सावरीत अनुभव देते.

नवीन कायेन व्हीएक्स आणि व्हीएट या अनुक्रमे ३४०एचपी आणि  ५५०एचपी ऊर्जानिर्मिती  करणाऱ्या इंजिन्सच्या दोन पयार्यात उपलब्ध आहे.  एट-स्पीडट्रान्समिशन आहे.  कायेन टबरे ३.९ सेकंदांत शून्यापासून १०० किलोमीटरचा ताशी वेग गाठत असून तसेच या गाडीचा सर्वोच्च वेग ताशी २८६ किमी एवढा असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ई-हायब्रीड प्रकारातील एसयूव्ही ४६२ एचपी ऊर्जा निर्माण करते.  बॅटरी पूर्ण चार्ज  केल्यानंतर ही गाडी इलेक्ट्रिक मोडवर १३५ किमीच्या वेगाने ४४ किमीपर्यंतचा माफक प्रवास करू शकण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कायेनच्या लौकिकाप्रमाणेच ही गाडी रस्त्यावर हाताळण्यास सोपी राहावी, आणि गाडीच्या वजनामुळे चालकाला वळणदार रस्त्यांवर कुठलीही अडचण येऊ  नये याची काळजी घेण्यात आली आहे. रिअर व्हील स्टेअरिंग प्रणालीमुळे वळणावर या गाडीचे वजन जाणवत नाही. गाडीच्या डिझाइनमध्ये फारसा फरक जाणवून येत नाही. गाडीच्या पूर्वपरिचित डिझााइनला धक्का न देता त्यात काही बदल करण्यात आले आहेत. गाडीचे बॉनेट आणि फ्रंट ग्रिलचे डिझाइन लक्ष वेधून घेतात. गाडीच्या मागच्या बाजूस पाहिले तर टेललाइटच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. गाडीचा लुक अधिक स्पोर्टी करण्यात आला आहे.

कायेन आधीपासूनच चालकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली एसयूव्ही म्हणून ओळखली जाते, मात्र या वेळी मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी चांगल्या प्रमाणात लेग स्पेस आहे. तर गाडीत सामान ठेवण्याची क्षमता १०० लिटर्सने वाढवण्यात आली आहे. या सिरीजमधील सर्वोत्तम कामगिरी करणारी पोर्श टबरेमध्ये असणाऱ्या एअर सस्पेंशनमुळे ऑफ रोड ड्रायव्हिंग करण्याचा पर्याय यात आहे.

गाडीचे वजन कमी करण्यासाठी कायेनच्या चॅसिस पूणर्पणे नव्याने डिझाइन करण्यात आल्या आहेत.  फोरडी चॅसिस कंट्रोल, थ्री चेंबर सस्पेंशन, इलेक्ट्रिक ४८०व्होल्ट रोल स्टॅबिलायझेशन आणि सरफेस कोटेड ब्रेक्स यामुळे ड्राइव्हिंगचा अनुभव अधिक सुखकर होतो. डिफॉल्ट ऑन-रोड पर्यायासह वाळू, चिखल, किंवा खडकाळ रस्त्यांवरून जाण्यासाठी विशेष पर्याय उपलब्ध आहेत. ही गाडी कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर उत्तम कामगिरी करतेच, शिवाय भारताच्या पश्चिम  भागातील वाळवंटांपासून ते ईशान्येकडील जंगलांपर्यंत कोणत्याही भूप्रदेशावर धावण्यास सज्ज असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

९११ प्रमाणे कायेनमध्ये प्रथमच रीअर-अ‍ॅक्सल स्टीअरिंग आणि संमिश्र आकारमानाच्या टायर्सचा वापर करण्यात आला आहे. या एसयूव्हीमध्ये अनेक साहाय्यकारी प्रणाली वापरण्यात आल्या आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट, इशारा देत गाडी थांबवणारी साहाय्य प्रणालीसह, पादचारी संरक्षण, पार्क असिस्ट आदींचा समावेश आहे. टबरेमध्ये देण्यात आलेल्या वैशिष्टय़पूर्ण टेलपाइप्स,  विस्तारित  एअर इंटेक्स आणि  डबल-रो फ्रंट-लाइटमुळे आपली वेगळी छाप उठवते. २१ इंचांचे टायर गडद टायटेनियमचे आहेत. रीअर अ‍ॅप्रन, बाहेरील आरसे आणि  दाराच्या बाजूचे ट्रीम्सदेखील गाडीच्याच रंगात उपलब्ध आहेत.

इंटिरीअर

सर्वाधिक बदल हे गाडीच्या इंटिरिअरमध्ये करण्यात आले आहे. गाडीत मध्यवर्ती कन्सोल डायरेक्ट टच कंट्रोलसह आहे.  पीसीएमचा नवीन १२.३ इंची टच डिस्प्ले वाहनाच्या सर्व कार्यासाठी इंटरफेस म्हणून काम करतो.  त्याच प्रकारे गाडीबाबतची सर्व माहिती म्हणजेच टायरमधील हवेचा दाब, इंधन भरल्यापासून झालेला प्रवास अशी माहितीदेखील आपल्याला स्पीडोमीटरच्या बाजूला देण्यात आलेल्या पॅनलवर दिसते. गाडीची किंमत पाहता ज्या प्रकारचा दर्जा ग्राहक अपेक्षित करतात तशा सुविधा गाडीत देण्यात आल्या आहेत. इंटेरिअरसाठी उच्च प्रतीच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. गाडीच्या सीट्स लांबच्या प्रवासातही आरामदायी ठराव्यात याकडे कंपनीने विशेष लक्ष दिले आहे.

कायेन टबरे

* इंजिन: ३९९६, व्ही ८ , ट्वीन टबरे पेट्रोल

*  ऊर्जा : ५५० एच पी

*  टॉर्क: ७७० एन एम

*  ट्रान्समिशन : ८ स्पीड ऑटोमॅटिक

*  पायाभूत रिटेल किमती पुढीलप्रमाणे

*  कायेन ११,९३६,००० रुपये

*  कायेन ई-हायिबर्ड १५,८०६,००० रुपये

* कायेन टबरे  १९,२१०,००० रुपये

vaibhavbhakare1689@gmail.com