पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी ‘हाय नी टो टॅप्स’ हा व्यायाम केला जातो. या व्यायामाने मांडय़ा, पोटरी आणि टाचेचे स्नायू मजबूत होतात. हा व्यायाम करण्यासाठी खुर्ची, स्टूल, लाकडी टेबल किंवा एखाद्या गुडघ्याइतक्या उंचीच्या साधनाचा वापर केला जातो.

कसे कराल?

* खुर्ची, लाकडी टेबल किंवा स्टूलच्या समोर उभे राहा. हात कंबरेवर ठेवा किंवा समोर घ्या.

* आता उडी मारून तुमचा डावा पाय खुर्चीवर ठेवा. त्यानंतर तात्काळ पाय बदलून दुसरा पाय खुर्चीवर ठेवा. असे करताना आधीचा पाय जमिनीवर घ्या. पुन्हा डावा पाय खुर्चीवर घेऊन उजवा पाय जमिनीवर ठेवा. ही कृती झटपट करा.

* ही कृती करताना पाठ आणि छाती सरळ ठेवा.

*  हा व्यायाम करताना वापरण्यात येणारी साधने म्हणजे खुर्ची, टेबल, स्टूल ही चांगल्या स्थितीत हवी. जमिनीवर समतोल उभी असणारी साधने असावीत. नाहीतर व्यायाम करताना पडण्याची भीती असते.

* जर खुर्ची किंवा टेबल नसेल तर जिन्याच्या पायऱ्यांवरही हा व्यायाम करता येतो.