News Flash

शहरशेती : कलम

ज्या झाडांच्या फांद्या जगत नाहीत, त्यांचे गुटी कलम (लेयर ग्राफ्टिंग) करतात

राजेंद्र भट

बागेत झाडे लावण्याच्या दोन पद्धतींची माहिती आपण मागील भागात घेतली. पण काही झाडे बिया पेरून किंवा फांदी थेट कुंडीत लावून जगवता येत नाहीत. त्यांचे कंदही नसतात. अशा झाडांची लागवड कलमाद्वारे करावी लागते.

कलम करणे हे कौशल्याचे काम आहे. फांदी कोणती निवडावी, तिचे दुसऱ्या झाडावर रोपण कसे करावे, त्यासाठी कोणते साहित्य आवश्यक असते, ते किती प्रमाणात वापरावे अशी सर्व माहिती आपण या भागात घेऊया..

ज्या झाडांच्या फांद्या जगत नाहीत, त्यांचे गुटी कलम (लेयर ग्राफ्टिंग) करतात. उदाहरणार्थ लिंबू, डाळिंब, पेरू, लिंबू इत्यादी. लागवड केलेल्या झाडाच्या जून फांदीवर हे कलम केले जाते. टोकाकडून साधारण एक-दीड फुटांवर फांदी कलम करतात. तेथील बारीक फांद्या, पाने कापून टाकावीत. त्या काडीवर धारदार सुरीने फक्त साल कापले जाईल असा काप द्यावा. आतील लाकडाला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी.

या जागेच्या वरच्या अथवा खालच्या बाजूला साधारण एक सेंटिमीटर अंतरावर पुन्हा साल कापावी. दोन कापांच्या मधली साल अलगद कापून टाकावी. या साल काढलेल्या भागावर कॅरडेक्स पावडर (मुळे फुटण्यासाठीचे संजीवक) लावावी. त्यावर मॉस (एक प्रकारचे शेवाळे) पाण्यात भिजवून नंतर पिळून घट्ट गुंडाळावे. त्यावर प्लास्टिक घट्ट बांधावे. साधारण महिनाभरात मुळे फुटतात. ती प्लास्टिकमधून दिसतात आणि हाताला कडकपणा जाणवतो. या वेळी फांदी खालच्या बाजूला थोडी कापावी. १०-१२ दिवसांनी आणखी थोडी कापावी. त्यानंतर ७-८ दिवसांनी गुटी झाडापासून वेगळी करावी. प्लास्टिक काढून पिशवीत लावावी. रोप तयार होईल. एका झाडावर अनेक गुटी कलमे करता येतात. मातृझाडाचे सर्व गुणधर्म त्यात येतात. हा शाखीय अभिवृद्धीचा सोपा पर्याय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:26 am

Web Title: article about tree plantation zws 70
Next Stories
1 ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ची क्लृप्ती
2 घरातलं विज्ञान : तापमापी
3 टेस्टी टिफिन : सोप्पे ग्रिल चिकन आणि पिटा
Just Now!
X