|| दीपा पाटील

साहित्य

१ किलो मोतिया तांदूळ (जाडे), २०० ग्रॅम उडदाची डाळ, २०० ग्रॅम गहू, २५ ग्रॅम मेथी, मीठ चवीनुसार

कृती

सर्व साहित्य एकत्र करून चक्कीमधून त्याचे जाडसर पीठ दळून आणा. एका पातेल्यात पाणी गरम करा व त्यात वरील पीठ टाकून उकड करा व गरम असतानाच चांगले मळून घ्या. हे पीठ रात्रभर कमीत कमी १० ते १२ तास फुलण्यासाठी ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी कढईत तेल चांगले गरम करा. हातास पाणी लावून त्याचे वडे थापून घ्या व त्यामध्ये भोक करून कढईत सोडा व लालसर रंगावर तळून घ्या.

टीप – १) आवडत असल्यास त्यात भाजलेले जिरे टाका. २) पीठ फुलून न आल्यास यीस्टचा वापर करा.