आपल्याकडे नवीन कपडय़ांचे खोके किंवा शर्टच्या पॅकिंगमधून जाड कागद येतात. ते फेकून देण्याऐवजी त्यांचा कलात्मक वापर करू शकतो. या कागदांचे बुकमार्क तयार करून ते पुस्तकांत खुणेसाठी ठेवू शकतो आणि वाचनप्रेमी मित्रांना भेट देऊ शकतो. यासाठी जुने वाळलेले ग्लास कलर्स सुद्धा वापरता येतील.

साहित्य

जुने वाळलेले ग्लास कलर्स, जाड कागद, कात्री, पंच, सॅटिन रिबन

कृती

  • जाड कागदाच्या निमुळत्या जाड पट्टय़ा कापा
  • साधारण विरुद्ध रंगाचे जुने वाळलेले ग्लास कलर्स शिंपडा, फुंकर मारून पसरवा.
  • रंग ओला असतानाच दुसरी पट्टी त्या कागदावर ठेवून त्यावरही रंगांचा छाप उमटवा.
  • हे रंग खूप ओलसर असतात आणि लवकर वाळतात म्हणून खूप कमी लागतात.
  • या कागदाचे चारही कोपरे गोलाकारात कापा, वरील बाजूस पंच यंत्राने दोन छिद्रे पाडा.
  • सॅटिन रिबनचा बो बांधा. की झाला बुकमार्क तयार.
  • अशा पद्धतीने शुभेच्छापत्रही तयार करता येतील.

apac64kala@gmail.com