19 September 2020

News Flash

शहरशेती : गॅलरीतील फुलझाडे

काही झाडे विशिष्ट ऋतूत फुलतात. काही वेली असतात, काही झुडुपे तर काही वृक्ष असतात.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

फुलांमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण होते, त्यामुळे घरात फुलझाडे हवीतच! उपलब्ध जागेत विविध फुलझाडे लावता येतात. काही झाडे देवपूजेसाठी, काही सुगंधासाठी तर काही सुंदर दिसतात म्हणून लावली जातात. काही झाडे विशिष्ट ऋतूत फुलतात. काही वेली असतात, काही झुडुपे तर काही वृक्ष असतात. काही माणसांना, काही कीटकांना तर काही पक्ष्यांना उपयुक्त ठरतात.

मुंबईत आवडीने आणि हमखास लावली जाणारी फुलझाडे म्हणजे गुलाब आणि मोगरा. आजच्या भागात गुलाबाविषयी जाणून घेऊ. गुलाबाचे दोन मुख्य प्रकार आहेत. देशी गुलाब आणि कलमे.

*    देशी गुलाब –

हे प्रामुख्याने थोडय़ा थंड प्रदेशात स्वाभाविकपणे जंगली स्वरूपात आढळतात. रोझा इंडिका आणि रोझा मल्टिफ्लोरा हे दोन प्रमुख प्रकार आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्वर परिसरात जंगली वेल प्रकारचा एकेरी गुलाब झुबक्यांनी फुलतो. आपल्याकडे पूर्वी झुडुपावर येणारे लाल गुलाब आणि वेलीवर येणारे गुलाबी गुलाब हे दोन प्रमुख प्रकार होते. काही ठिकाणी झुबक्याने पांढरी फुले येणारा वेल स्वरूपातील गुलाब आढळत असे.

नंतर पाश्चात्त्य जाती आल्या. यात अतिशय मोहक रंग आणि आकर्षक आकार उपलब्ध झाले. या झाडांवर जवळपास वर्षभर फुले येतात. याचे प्रमुख चार प्रकार आहेत.

*    हायब्रिड गुलाब –

याला भरपूर पाकळ्यांची मोठी फुले येतात. बहुतेक वेळा एका फांदीवर एकच फूल येते.

*    फ्लोरीबंडा –

ही फुले आकर्षक झुबक्यात येतात, मात्र हायब्रिडपेक्षा लहान आकाराची असतात. यांना पाकळ्या कमी असतात.

*    मिनिएचर –

ही एक सेंटिमीटरची अतिशय लहान फुले असतात. झुबक्यात येतात आणि जवळजवळ वर्षभर फुलतात. ही झाडे ठेंगणी असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:05 am

Web Title: article on city farming 3
Next Stories
1 समाजभानाचे रंग
2 कॉलेज आठवणींचा कोलाज : आजही ‘फग्र्युसन’चा अविभाज्य घटक
3 स्वादिष्ट सामिष : मटण घी रोस्ट
Just Now!
X