News Flash

शहरशेती : अबोली, कोऱ्हांटी

अबोली ही सदाहरित वनस्पती आहे. तिची फार देखभाल करावी लागत नाही आणि फुले बराच काळ टिकतात.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

अबोली ही सदाहरित वनस्पती आहे. तिची फार देखभाल करावी लागत नाही आणि फुले बराच काळ टिकतात. अबोलीचे साधारण तीन प्रकार आढळतात. अबोलीसारखीच असणारी कोऱ्हांटी ही वनस्पतीही थोडय़ा सावलीत देखील वाढते. कोऱ्हांटीचे १०-१२ प्रकार आढळतात.

या झाडांची लागवड जून फांद्यांपासून करता येते. पावसाळा सुरू झाल्यावर जून फांद्या कापाव्यात. कटिंग लावताना सर्व पाने कापून टाकावीत, तोडू नयेत. मिळाल्यास कॅरडेक्स हे मुळे फुटण्यासाठी लावले जाणारे संप्रेरक वापरावे. अबोलीची लागवड बियांपासूनही करता येते.

अबोलीची फुले झाडावर तीन-चार दिवस टिकतात. त्यानंतर गळतात. गळल्यानंतरही ती कोमेजलेली दिसत नाहीत. कोऱ्हांटीची फुले दुसऱ्या दिवशीच गळतात. यांना जी बोंडे येतात ती पाणी पडल्यावर फुटतात आणि बिया आजुबाजूला पसरतात.

या दोन्ही झाडांना कीड किंवा रोग जवळपास लागतच नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही ही झाडे तगून राहतात. गेली काही वर्षे सदाफुलीची लागवड वाढत चालली आहे. सदाफुली या नावातच सर्वकाही सामावलेले आहे. ही वनस्पती ठेंगणी आणि काटक असते. पूर्वी आपल्याकडे सदाफुली दोन-चार रंगांत मिळत असे. आता अनेक प्रकार मिळतात. सदाफुलीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर तिची लागवड केली जाते. सदाफुलीला बारीक शेंगाही येतात. या शेंगांत बारीक बिया असतात. या बिया पेरून लागवड करता येते. जुन्या जाती ३-४ वर्षे टिकतात. नव्या हंगामी असतात. अबोली, कोऱ्हांटी, सदाफुली या वर्गातील वनस्पती विशेष काळजी न घेता वाढवता येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:12 am

Web Title: article on city farming 4
Next Stories
1 कलाकारी : पुठ्ठय़ाचं खेळघर
2 अभ्यासाचे अ‍ॅपसोबती!
3 घरातलं विज्ञान : साधी यंत्रे
Just Now!
X