राजेंद्र श्रीकृष्ण भट

वर्षभर फुले येणाऱ्या कंदफुलझाडांमध्ये सोनटक्का हे एक महत्त्वाचे कंदफुलझाड आहे. हे झाड कमी जागेत वाढते. जास्त उंच नसते. मात्र, काटक असते. त्याला शक्यतो कीड लागत नाही किंवा रोग होत नाहीत.  सोनटक्क्याचे त्याच्या रंगानुसार तीन प्रकार आहेत. पांढरा, पिवळा, गुलाबी. पांढरा सोनटक्का सर्वत्र आढळतो. पिवळा कोकण प्रांतात बहुतेक ठिकाणी आढळतो. गुलाबी सोनटक्का दुर्मीळ आहे. या फुलांचा सुगंध दरवळतो.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

सोनटक्क्याची लागवड कंद लावून करतात. या कंदांच्या उत्तम वाढीसाठी मातीत सेंद्रिय घटक भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे.  खरे तर सर्वच वनस्पतींच्या उत्तम वाढीसाठी मोकळी, पोकळ आणि अन्न घटकांनी समृद्ध जमीन आवश्यक असते. चिकट मातीत कंद चांगले वाढत नाहीत. हे कंद मातीला समृद्ध करतात.

सोनटक्का लावलेल्या कुंडीत सतत घरातील भाजीपाल्याची देठे, फळांच्या साली, टाकाव्यात. सेंद्रिय घटक जागेवरच कुजून समृद्ध झालेली माती कंद वनस्पतींना आवडते.

इतर कंद फुलझाडे फुले येऊन गेल्यावर मरतात. सोनटक्क्य़ाची झाडे मात्र मरत नाहीत. फुले येऊन गेल्यावर पाणी देणे बंद करावे. झाडे पूर्ण सुकली, की मातीतील कंद काढून, वेगळे करून ठेवावेत आणि पुन्हा लागवड करावी