13 November 2019

News Flash

नवलाई

‘दायवा’ या कंपनीने साऊंडबारचा अंतर्भाव असलेला नवा एलईडी स्मार्टटीव्ही बाजारात आणला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘दायवा’चा नवा एलईडी टीव्ही

‘दायवा’ या कंपनीने साऊंडबारचा अंतर्भाव असलेला ‘ऊ32रइअफ’ हा नवा एलईडी स्मार्टटीव्ही बाजारात आणला आहे. क्रिकेट पिक्चर मोड, सराऊंड साऊंड, वाइड कलर गॅमूट, लक्षवेधक कॉन्ट्रास्ट रेशिओ, १३६६ बाय ७६८ पिक्सेलचे रेझोल्युशन,  १.५ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर, एक जीबी रॅम, आठ जीबी अंतर्गत मेमरी अशी या टीव्हीची वैशिष्टय़े आहेत.

किंमत : १२९९० रुपये

‘पिजन’चा ‘वेट ग्राइंडर’

पिजन या कंपनीने भारतात नवीन ‘वेट ग्राइंडर’ उपकरण आणले असून हे उपकरण विजेचा धक्का आणि गंज यापासून सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. या ग्राइंडरमध्ये १५० वॉटची मोटर पुरवण्यात आली आहे. यामध्ये पुरवण्यात आलेला ‘ड्रम’ वेगळा करण्याची सुविधा असल्याने ग्राइंडर धुण्यात अडचण येत नाही. या ग्राइंडरचा वापर करून विविध प्रकारच्या ओल्या चटण्या, ओल्या नारळाचा कीस काढणे, डोशाचे पीठ तयार करणे या कृती करता येतात.

इन्फिनिक्सचा ‘हॉट ७ प्रो’

ट्रान्शन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड इन्फिनिक्सने हॉट ७प्रो हा आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. सहा जीबी रॅम, ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज, ६.१९ इंचांचा एचडी डिस्प्ले, ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी, १३+२ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा, १३+२ मेगापिक्सेलचा पुढील कॅमेरा अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत.

किंमत : ९९९९ रुपये

‘अ‍ॅम्ब्रेन’चा वायरलेस हेडफोन

अ‍ॅम्ब्रेन इंडियाने वायरलेस इअरफोन्स ‘एएनबी-११’ (नेको) सादर करून आपल्या ऑडीओ विभागाचा विस्तार केला आहे. हे इअरफोन्स ब्लूटूथ ५.० टेक्नॉलॉजीसह सुसज्जित आहेत. हे तुम्हाला आपल्या आवडीचे संगीत ऐकताना कोणत्याही व्यत्ययाशिवाय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करतील. त्याचबरोबर याद्वारे १० मीटपर्यंत ऑडिओ ट्रान्समिशनबाबत व्यत्यय न येता कॉल्स उचलता येतात. नॉइज आयसोलेशन टेक्नॉलॉजीसह, एएनबी-११ हा खात्री करतो की, बाहेरील कोणताही आवाज तुमच्या व तुमच्या आवडत्या संगीतामध्ये व्यत्यय आणणार नाही. याची १५० एमएएचची डय़ुरेबल लिथियम पॉलीमर बॅटरी ४ तासांचा म्युझिक टाइम आणि ६ तासांपर्यंत टॉक टाइम देते. यामध्ये बिल्ट-इन मायक्रो एसडी स्लॉटदेखील आहे.

किंमत : १९९९ रुपये.

First Published on June 20, 2019 12:14 am

Web Title: article on daiwa led tv