टोयोटा ग्लँझाच्या निमित्ताने टोयोटा किलरेस्कर मोटरने प्रीमियम हॅचबॅक श्रेणीत प्रवेश केला आहे.  बहुप्रतीक्षित ग्लँझाबद्दल मोटार क्षेत्रात कमालीची उत्सुकता होती. एक आठवडय़ापूर्वी बाजारात दाखल झालेल्या ग्लँझाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्लँझाच्या रूपाने प्रीमियम हॅचबॅक श्रेणीत नवा प्रतिस्पर्धी दाखल झाला आहे.

प्रीमियम हॅचबॅक श्रेणीतील या गाडीचे डिझाइन आणि लूक्स मारुती सुझुकी बलेनोची आठवण करून देतात. ग्लँझा ही हुंदाईची आय २०, होंडाची जॅझ आणि वोक्सवैगनची पोलो या गाडय़ांसाठी स्पर्धा ठरणार आहे.

शक्तिशाली तरीही कमी इंधन वापरणारे के-सीरिज पेट्रोल इंजिन असलेली ही ग्लँझा गाडी चालवण्याचा उत्तम अनुभव देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर शक्ती आणि कमी टॉर्कसोबतच सीव्हीटी/एमटी ट्रान्समिशन निवडीची मुभा देण्यात आली आहे.  ग्लँझाच्या सर्व प्रकारच्या गाडय़ांचे इंजिन बीएस-६ चे सर्व निकष पूर्ण असे कंपनीने म्हटले आहे.  कंपनीने नेहमीच्या ३ वर्षे/ १००००० किलोमीटर्सपासून ५ वर्षे/ २२००००   किलोमीटर्सपर्यंत वाढीव वॉरंटी देऊ  केली असून, त्यासोबत ‘टोयोटा ओनरशीप एक्स्पिरियन्स’, क्यू-सव्‍‌र्हिस अप युटिलायझेशन आणि टोयोटा कनेक्ट सुविधा त्याचबरोबर अर्थसहाय्य योजनाही कंपनीने उपलब्ध करून दिल्या आहेत.

गाडीच्या बहिर्गत वैशिष्टय़ांमध्ये डीआरएल सहा एलईडी प्रोजेक्टर हेडलँप्स त्यासह फॉलो-मी-होम तंत्रज्ञान, ऑटो हेडलँप्स आहे. गाडीला समोर असलेले टू स्लॉट ३डी क्रोम ग्रिलची रचना आकर्षक आहे. गाडीच्या बंपरची ठेवणं ही स्टायलिश आणि आक्रमक आहे, गाडीला डायमंड कट अलॉय चाके देण्यात आली आहेत. मागच्या बाजूला लाइट गाइडसह एलईडी रिअर कॉम्बिनेशन लँप्स देण्यात आले आहेत. अतिनील किरणांपासून संरक्षण करणारी काच.

गाडीत संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी पुढच्या बाजूला चालक आणि सहप्रवेशासाठी दोन एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. गाडीत एबीएस सुविधेसह इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन तंत्रज्ञान, ब्रेक असिस्ट या सुविधा देण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या आसनासाठी आयएसओफीक्स चाइल्ड सीट टेथर अँकरेज देण्यात आला आहे.सुरक्षेसाठी रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, चार रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्री-टेन्सनर्स सीटबेल्ट त्याचप्रमाणे चालक आणि सहप्रवाशाच्या सीटबेल्टमध्ये अपघाताच्या वेळी चालकाला स्थिर ठेवणाऱ्या फोर्स लिमिटर्स तंत्रज्ञनाचा वापर केला आहे. गाडीचा वेग जास्त झाल्यास त्याबाबत सावध करणारी बझर यंत्रणा आणि इलेक्ट्रोक्रेमिक इनर रिअर व्ह्य़ू आरसे देण्यात आले आहेत.

ग्लँझा हे नाव मूळ जर्मन शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ आहे तेजस्वी/चमक/झळाळी असा आहे. ही नवी हॅचबॅक गाडी विशेष करून तरुण ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन करण्यात आली आहे. बाहेरून स्टायलिश असणाऱ्या नव्या  टोयोटा ग्लाँझाचे केबिनदेखील आकर्षक आहे. आरामदायी अगरेनॉमिक डिझाइन, स्वँकी अशा प्रकारचे अनोखे डय़ूएल-टोन इंटिरिअर्स आणि  स्मोक सिल्व्हर कलरचा वापर केबिनमध्ये करण्यात आला आहे.

गाडीच्या केबिनची रचना साधी पण आकर्षक ठेवण्यात आली आहे. प्रीमियम हॅचबॅकला साजेशा सोयी ग्लॅन्झाच्या केबिनमध्ये आढळतात. गाडीत नवे स्मार्ट प्लेकास्ट तंत्रज्ञान देण्यात आले आहे. टचस्क्रीन ऑडिओ चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर्ससह. स्मार्टफोन आधारित नेव्हीगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी गाडीत अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो या सुविधा दिल्या आहेत. स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन करण्यासाठी व्हॉइस कमांडसहित सुविधा, इंटरअ‍ॅक्टिव्ह टीएफटी मल्टि इन्फॉर्मेशन डिस्प्ले दोन प्रकाराच्या कापडाची वापर करून बनवण्यात आलेल्या सीट्स, पुढे मध्यभागी आर्मरेस्टमध्ये वस्तू ठेवायला अतिरिक्त जागा, तर सामान ठेवण्याच्या जागेसाठी विशेष दिवा देण्यात आला आहे. प्रीमियम श्रेणीचा आरामदायी आणि सोयींनी परिपूर्ण प्रवासाचा आनंद देण्यासाठी गाडीत  इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटणासोबत स्मार्ट एंट्री ६० : ४० या अनुपातात दुमडता येणाऱ्या मागच्या सीट्स,  रिमोट कीशिवाय एंट्रीची सोय, ओआरव्हीएम इलेक्ट्रिक अ‍ॅडजेस्ट आणि र्रिटॅक्ट व ऑटो फोल्ड, टिल्ट आणि टेलिस्कोपिक तंत्रज्ञान असणारे इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग, व्हॅनिटी मिरर आणि लँपसह ड्रायव्हर आणि सहप्रवाशासाठी सनव्हायजर या सोयी देण्यात आल्या आहेत.

लोकांच्या जीवनशैलीनुसार कार जगताचेही रूप बदलत आहे. ग्राहकांची उत्पादने आणि सेवांबद्दलची जागरूकता वाढली आहे, त्यामुळे ग्राहकांच्या मागण्याही वेगाने वाढत आहेत. ग्राहक हा कायमच केंद्रबिंदू असतो आणि आम्हाला सातत्याने नव्या गोष्टी शिकून व संशोधन करून त्याच्या बदलत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. भारतासारख्या गतिशील बाजारपेठेच्या गरजा आणि ब्रँडकडून असणाऱ्या अपेक्षा या आधारावर आमच्या ग्राहकांना सतत वेगवेगळ्या पर्यायांची श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो, असे टोयोटा किलरेस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक मासाकाझु योशिमुरा यांनी म्हटले.

वैशिष्टय़े:

*  बीएस-६  निकषांधारित ६६ केडब्ल्यू   (८९. ७ पीएस) साठी जी एमटी ( आधुनिक ली-आयॉन बॅटरी आयएसजीसह)  आणि

*  (८२.९ पीएस) जी सीव्हीटी / व्ही सीव्हीटी आणि  व्ही एमटी साठी के-सीरिज पेट्रोल इंजिन

*  ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सीव्हीटी (कंटिन्युएसली व्हेरिएबल ट्रान्समिशन) इंधन कार्यक्षमता २३.८७ केएमपीएल,

*  (जी एमटी आधुनिक ली- आयॉन बॅटरी आयएसजी सोबत) आणि १९.५६ केएमपीएल (सीव्हीटी), २१.०१ केएमपीएल (व्ही एमटी)

*  आधुनिक ली आयॉन बॅटरी करॅ सोबत (इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर) टॉर्क असिस्ट फंक्शन, आयडल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञान, ऊर्जा पुनरुत्थान तंत्रज्ञान (केवळ जी एमटीमध्ये)