21 September 2020

News Flash

व्हिंटेज वॉर : इतिहास ‘कॅफे रेसर’चा

इंग्लडमधील रस्त्यांवर १९५०च्या दशकात जन्माला आलेली ‘कॅफे रेसर’ ही किंबहुना सर्वाधिक महत्त्वपूर्ण चळवळ म्हणता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

इंग्लडमधील रस्त्यांवर १९५०च्या दशकात जन्माला आलेली ‘कॅफे रेसर’ ही किंबहुना सर्वाधिक महत्त्वपूर्ण चळवळ म्हणता येईल. जगात आजही कॅफे रेसरच्या परंपरेचा उत्कर्ष होत आहे. ‘कॅफे रेसर’ हा दुचाकी जगताचा इतका महत्त्वपूर्ण घटक असूनही याबाबत बरेच जण अनभिज्ञ आहेत.

कमी अंतरावर जास्तीत जास्त वेग गाठण्यासाठी मोटारसायकलीत बदल केले जात. कमी उंचीवर लावलेले हँडलबार, मोठय़ा आकाराची इंधन टाकी ज्यावर बसल्यावर गुडघ्यांनी पकड बनवली जाते ही या बाइकच्या डिझाइनची काही वैशिष्टय़े.  कॅफे रेसर हे विशेषण बाइक आणि चालक या दोघांनाही वापरता येते. एखाद्या योद्धय़ाप्रमाणे असलेले आक्रमक डिझाइनमुळे कॅफे रेसर बाइक्सना आदराचे स्थान आहे. साध्या बाइकला वेगात पळवण्यासाठी तिच्यात बदल केले जात  १६० किमीचा वेग गाठणे ही या रेसर्ससाठी अभिमानाची गोष्ट होती. त्या वेळी ६५०सीसीच्या बाइकवर १६० किमीचा  वेग गाठण्याचा प्रयत्न करीत. कॅफे रेसरची संस्कृती आता जगभरात पसरली आहे.  मोठय़ा मोटारबाइक कंपन्या कॅफे रेसरची निर्मिती करतात.

बाइक जगतावरील  कॅफे रेसरच्या प्रभावामुळे ट्रायम्फ बोनव्हील, होंडा सीबी-७५० आणि कावासाकी झेड-१ यांचा जन्म झाला. कॅफे रेसर्सनी त्यांच्या सामान्य बाइकची हाताळणी आणि क्षमता वाढविण्यासाठी मोटारसायकलींमध्ये बदल करुन या अफाट दुचाकींची निर्मिती केली. आधुनिक स्पोर्ट्स बाइकवर या कॅफे रेसरचा मोठा प्रभाव आहे. १९५०च्या दशकात लंडनमध्ये जरी कॅफे रेसरच्या पंरपरेचा जन्म झाला असला तरी पुढे याचे चाहते जगभरात वाढले.  तरुणाईला असलेल्या वेगाच्या प्रेमातून कॅफे रेसर जन्माला आली. प्रति तास  १०० मैल म्हणजेच १६० किमीचा वेग गाठणे हा चालकांचा उद्देश होता. कॅफेत वेळ घालवणाऱ्या आणि एकमेकांमध्ये शर्यती लावणाऱ्या तरुणांना उपहासाहाने कॅफे रेसर म्हटले जायचे. ते ट्रान्स्पोर्ट कॅफेमध्ये आपला वेळ घालवत आणि कोणी वेगवान बाइक घेऊन आपल्याला शर्यतीला आव्हान देतोय का याची प्रतीक्षा करीत. शर्यत ठरल्यावर कॅफेतील सर्व जण रस्त्यात प्रेक्षक म्हणून गर्दी करीत. अशा शर्यती लावणाऱ्या तरुणांना ‘रेसर’ म्हणून गांभीर्याने घेतले जात नसे. त्यांना उपहासाने कॅफे रेसर म्हटले जाऊ  लागले आणि कालांतराने हा उपहासात्मक शिक्काच ही मंडळी आपली ओळख म्हणून मिरवू लागली.

लंडनमधील अेस कॅफे हे कॅफे रेसरच्या जन्मस्थानांपैकी एक मानले जाते. १९५० आणि ६० च्या दशकात तरुण-तरुणी आपल्या बाइक घेऊन या कॅफेत जमत असत. या तरुणांना रॉक अ‍ॅण्ड रोल पिढीचे तरुण म्हटले जात. तेव्हा उपलब्ध असलेले त्यांना परवडणारे सर्वात वेगवान वाहन त्यांनी विकत घेतले होते. ते म्हणजे मोटारबाइक. अमेरिकेत कार जास्त वापरल्या जात होत्या. त्यातून तेथे हॉटरॉडची परंपरा रुजली. अमेरिकेच्या तूलनेत ब्रिटनमधल्या तरुणांनी शर्यतींसाठी खिशाला परवडणारी असल्यामुळे बाइकची निवड केली. अमेरिकेत डायनर या छोटेखानी उपाहारगृहाची परंपरा आहे. येथे ज्युकबॉक्स नावाच्या यंत्रावर गाणी लावली जात. ब्रिटनमध्ये कॅफेमध्ये असे ज्युकबॉक्स ठेवले जात. १९५० मध्ये ब्रिटनमध्ये रॉक अ‍ॅण्ड रोल संगीताची लोकप्रियता वाढत होती. परंतु तरुणांना कोणत्याही क्लब किंवा रेडिओवर हे संगीत ऐकायला मिळत नव्हते. म्हणून बाइकवर एका कॅफेतून दुसऱ्या कॅफेत जाऊन गाणी ऐकणे. तेथे जाताना शर्यत लावली जात. इंग्लंडमधील तरुणांनी सुरू केलेली ही कॅफे रेसर संस्कृती एका बंडाचे प्रतीक होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:03 am

Web Title: article on history cafe racer
Next Stories
1 उन्हाळ्यातील भटकंती
2 झांजिबार फिश सूप
3 परदेशी पक्वान्न : ऑस्ट्रेलियन मँगो चिकन करी
Just Now!
X