25 February 2021

News Flash

एमजीची नवी ‘हेक्टर’

हिंग्लिश व्हॉइस कमांड्ससह अपडेट केलेले आयस्मार्ट व इतरही अनेक फीचर्स आहेत

(संग्रहित छायाचित्र)

एमजी मोटरने ‘हेक्टर २०२१’ ही अद्ययावत रचनेसह १२.८९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात आणली आहे. यात फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स डय़ुएल टोन आतील व बाहेरील रचना असून निवड करण्यासाठी विविध पर्याय आहेत. हिंग्लिश व्हॉइस कमांड्ससह अपडेट केलेले आयस्मार्ट व इतरही अनेक फीचर्स आहेत. ही कार आता ७ ,५ व ६ आसनांच्या पर्यायात उपलब्ध आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव छाबा यांनी सांगितले की,  ‘हेक्टर २०२१’ची निर्मिती करताना आम्ही ग्राहक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय विचारात घेऊन बदल केले आहेत. अद्ययावत हेक्टरने या इंटरनेट एसयूव्हीला आपल्या सेगमेंटमधील अधिक आकर्षक पर्याय बनवला आहे.

आयस्मार्ट अपडेट्स

हेक्टर २०२१ मध्ये आयस्मार्टची सुविधा सुधारित करण्यात आली आहे. यात हिंग्लिश व्हॉइस कमांड्स देण्यात आल्या आहेत. चाकांमधील हवेच्या दाबाच्या सूचना मिळण्याकरिता इंजिन स्टार्ट अलार्म आहे. इंटरनेट एसयूव्हीला आता सनरूफ (खुल जा सिम सिम), एफएम (एफएम चलाओ), एसी (टेम्परेचर कम कर दो) यासारख्या ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्स समजू शकते व त्यानुसार प्रतिसाद देऊ  शकते. या कारमध्ये ६०हून अधिक कनेक्टेड पर्याय देण्यात आले आहेत. त्यात अ‍ॅपल वॉचवर आयस्मार्ट अ‍ॅप, गाना अ‍ॅपमध्ये गाण्यासाठी व्हॉइस सर्च, वायफाय कनेक्टिव्हिटी, अ‍ॅक्युवेदरद्वारे हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या वाहनात २५ पेक्षा जास्त सुरक्षिततेच्या सुविधा आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रिअर वायपर व वॉशर तसेच रिअर डीफॉगर इत्यादींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 12:00 am

Web Title: article on new mg hector abn 97
Next Stories
1 नवकरोनाचे नाहक भय
2 आयुर्उपचार : शिरोधारा
3 सौंदर्यभान : लायपोसक्शन
Just Now!
X