रेनो या युरोपीयन वाहन कंपनीने कॅप्चर ही एसयूव्ही नुकतीच सादर केली. चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देऊन ही गाडी तयार करण्यात आली आहे. तरीही यासाठी गाडीच्या डिझाइन आणि स्टाइलमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नाही. अद्ययावत सुविधा आणि सुरक्षेच्या यंत्रणा ही या गाडीची वैशिष्टय़े आहेत.

नवीन रेनो कॅप्चरमध्ये विविध सुरक्षा वैशिष्टय़ांसह डय़ूएल एअरबॅग्ज, एबीएस सह इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन (ईबीडी) व ब्रेक असिस्ट, वेग इशारा, पार्किंगसाठी सुचना यंत्रणा, सीट बेल्ट रिमाइंडर, उंची कमीजास्त करण्याची सुविधा असलेल्या सीटबेल्ट, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक देण्यात आले आहे. ही सर्व सुरक्षा वैशिष्टय़े नवीन रेनो कॅप्चरच्या सर्वच व्हर्जन्समध्ये उपलब्ध आहेत.

रेनो कॅप्चर अद्ययावत संकल्पनायुक्त वाहन चालवण्याचा अनुभव देते. कॅप्चर ही रेनोची डिझाइन सुलभता आणि सुसज्जतेचा संगम असून ते चालकाला गाडीशी एकरूप करते. रेनो कॅप्चर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे, ज्यामुळे वाहन चालवणे, सुलभ आणि आरामदायक बनते, असा कंपनीचा दावा आहे.

रेनो कॅप्चरमध्ये देण्यात आलेल्या मुख्य पॅनेलला ‘इन्फीनीटी इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर असे म्हटले आहे. यात १७.६४ सेमीची टचस्र्कीन असून पार्किंग कॅमेरासह नव्याने सादर करण्यात आलेले वॉईस रेकगनेशन, अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले या सुविधा देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आता त्यांच्या स्मार्टफोन्सवर गुगल मॅप्सच्या साहाय्याने अद्ययावत नेव्हिगेशन उपलब्ध झाले आहे. यामध्ये इको गाईडही दिले आहे. ही यंत्रणा चालकाच्या गाडी चालवण्याच्या सवयींची नोंद करते आणि चालकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देते.

रेनो कॅप्चर ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे.

पेट्रोल पर्यायाकरिता १६ वॉल्व चार सिलेंडर १.५ एल एच४ के पेट्रोल इंजिनयुक्त पाच स्पीड मॅन्युएल गियरबॉक्स देण्यात आले आहे, जे चार हजार आरपीएमवर १४२ एनएम टोर्क, तर ५६०० आरपीएमवर १०६ पीएस निर्माण करते. पेट्रोल पॉवरट्रेन १३.८७ एवढा अ‍ॅवरेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

डिझेल पर्याय १.५ एल के ९ के डिझेल इंजिन (कॉमन रेल इंजेक्शन) सोबत ६ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स  ३८५०आरपीएमवर ११० पीएस कमाल शक्ती, तर १७५० आरपीएमवर २४० एनएम सर्वोच्च टॉर्क देते. डिझेल पॉवरट्रेन २०.३७ केएमपीएल (एआरएआय प्रमाणित)एवढे  अ‍ॅवरेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

रेनो कॅप्चरच्या सर्वच पर्यायांमध्ये त्यात ५० हून अधिक वैशिष्टय़े उपलब्ध आहेत. प्लॅटीनमध्ये अल्ट्रा-प्रीमियम ब्लॅक आणि आयव्हरी इंटेरीयर आहे, त्यासोबतच विरुद्ध रंगसंगती अ?ॅक्सेंट आणि ब्लॅक लेदर्ड सीट्स आहेत. इर्गो डिझाईनच्या सीटमध्ये सहा प्रकारे बदल करता येतात. त्यामुळे पुढच्या आणि मागच्या जागेत जास्त लेगरूम मिळते. सामान ठेवण्यासाठी ३९२ एवढी जागा असून ती १,३५२ लिटपर्यंत वाढवणे शक्य आहे.

वैशिष्टय़े

ल्ल डय़ूएल एअरबग्ज, अँटीलॉक-ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) सोबत इलेक्ट्रोनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), रिअर पार्किंग सेन्सर, चालक आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, वेग मर्यादा इशारा यंत्रणा

*  नवीन १७.६४ सेमी टचस्क्रिन अ‍ॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, इको गाईड, वॉईस रिकगनायजेशन सुविधा

*   आरएक्सई (पेट्रोल व डिझेल) आणि प्लॅटीन डय़ूएल टोन (पेट्रोल आणि डिझेल) या पर्यायांमध्ये उपलब्ध. एलईडी हँडलॅम्प आणि सफायर एलईडी डीआरएल व रिपेल टेल लॅम्प

रेनो कॅप्चर किंमत

(एक्स-शोरूम, मुंबई)

* आरएक्सई पेट्रोल ९,४९,९९९

*  प्लॅटीन पेट्रोल डय़ूएल टोन ११,९९,९९९

* आरएक्सई डिझेल १०,४९, ९९९

*  प्लॅटीन डिझेल डय़ूएल टोन १२,९९,९९९

रेनो विषयी

रेनो इंडिया प्रा. लि. ही रेनो एस. ए. एस. फ्रान्सच्या मालकीची उपकंपनी आहे. रेनो  इंडिया कारची निर्मिती ओरागडम, चेन्नई येथे होते. वर्षांला ४८०,००० युनिटची निर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. रेनो देशातील ३५० विक्री आणि २६९ सेवा सुविधा केंद्रांमधून कार्यरत आहे. ६० हून अधिक पुरस्कार पटकावणारा रेनो इंडिया हा वर्षभराच्या कालावधीत भारतात सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा ब्रँड ठरला. रेनो क्विडने आधीच ३२ पुरस्कार मिळवले आहेत, ज्यामध्ये १० ‘कार ऑफ द इयर’ पुरस्कारांचा समावेश आहे.