स्रिटॉनचे भारतात पदार्पण

पीएसए समूहाने भारतात स्रिटॉन ब्रॅण्ड दाखल केला आहे. पीएसएने ‘पुश टू पास’ या धोरणात्मक योजनेचा दुसरा टप्पा सादर करीत असताना, स्रिटॉन ब्रॅण्ड भारतात प्रवेश करीत असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली. या समारंभामध्ये, स्रिटॉन सी ५ एअरक्रॉस ही एसयूव्ही सादर करण्यात आली. भारतीय ग्राहकांसाठी स्रिटॉनकडून स्रिटॉन सी ५ एअरक्रॉस हे पहिले वाहन २०२०च्या अखेरीपूर्वी दाखल केले जाणार आहे. स्रिटॉन सी ५ एअरक्रॉस या एसयूव्हीनंतर स्रिटॉन आणखी काही उत्पादने बाजारात दाखल करणार आहे. ही वाहने भारतात निर्माण केली जाणार आहेत. नवी स्रिटॉन सी ५ एअरक्रॉस एसयूव्हीनंतर, २०२१ या वर्षांपासून दरवर्षी नवे वाहन दाखल करीत, ही नवी उत्पादन उर्वरित जगात सादर करण्यापूर्वी भारतात दाखल केली जाणार आहेत.

स्रिटॉन सी ५ एअरक्रॉस एसयूव्हीची लांबी ४.५ मीटर आहे. मोठी चाके, जास्त ग्राउंड क्लीअरन्स व रूफ बार्स यामुळे एसयूव्ही श्रेणीमध्ये इतरांपेक्षा वेगळे दिसून येईल. सुसज्ज सेंट्रल कन्सोल आणि अत्याधुनिक सोयींचा समावेश करण्यात आला आहे. स्रिटॉनने १९१९ सालापासून वाहन क्षेत्रातील एक लोकप्रिय ब्रॅण्ड म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तसेच, ब्रॅण्डने लोकांकडून व त्यांच्या जीवनशैलीकडून प्रेरणा घेतली आहे. (स्रिटॉन अ‍ॅडव्हॉयजर, ‘ला मायसन स्रिटॉन’, इ.).२०१८ मध्ये, ब्रॅण्डने ९० हून अधिक देशांत १.०५ दशलक्ष वाहनांची विक्री केली.

एमजी मोटरद्वारे ‘इंटरनेट कार’चे अनावरण

प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर (मॉरिस गॅरेज)ने आयस्मार्ट नेक्स्ट जेनसह भारतात एक अभूतपूर्व असे तंत्रज्ञान सादर केले. आयस्मार्ट नेक्स्ट जेन वैश्विक तंत्रज्ञान कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आली आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेनने सुसज्ज एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार असणार आहे. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, अनलिमिट, एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्टय़े प्रस्तुत केली, जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील.

एमजी हेक्टरमध्ये व्हॉइस असिस्टची सुविधा असणार आहे. क्लाउड आणि हेड युनिटवर चालणारी ही सुविधा न्यूआन्सने भारतासाठी विकसित केली असून भारतीयांचे उच्चार ओळखण्यासाठी ती तयार केली आहे. हे व्हॉइस असिस्ट ‘हॅलो एमजी’ म्हटल्याने सक्रिय होते. ही यंत्रणा खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, वातानुकूलन यंत्रणा, नेव्हिगेशन इत्यादीचे नियंत्रण करते आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अ‍ॅपद्वारे वापरता येणार आहे. यातील अनेक सुविधांचा भारतात प्रथमच वापर केला जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रत्येक वेळी अ‍ॅप सुरू केल्यानंतर मोटार स्कॅन केली जाते आणि मोटारीचे स्थान, टायरमधील हवेचा दाब, दरवाजे बंद आहेत की नाही आहे, अशा प्रकारची माहिती दिली जाते. दरवाजे लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्यासाठी हे रिमोट अ‍ॅप वापरू शकतात.