महिंद्राची नवी टीयूव्ही ३००

महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीने त्यांच्या टीयूव्ही३०० या एसयूव्हीला नव्या रूपात बाजारात दाखल केले आहे. या गाडीत नवी वैशिष्टय़े समाविष्ट करण्यात आली आहेत. नवी टीयूव्ही३०० ८.३८ लाख रुपयांत (एक्स शोरूम मुंबई) उपलब्ध करण्यात आली आहे.

नव्या टीयूव्ही ३०० मध्ये नवे, आक्रमक, फ्रंट ग्रिल काळ्या रंगातील क्रोमो इन्सर्टसह, दणकट साइड क्लॅडिंग आणि नव्याने तयार करण्यात आलेले व्हील कव्हर समाविष्ट करण्यात आले आहे. डीआरएल नवे हेडलॅम्प डिझाइन आणि कार्बन ब्लॅक फिनिश यामुळे टीयूव्ही ३००च्या शैलीत अधिक भर पडली आहे.   नव्या टीयूव्ही ३००मध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, १७.८ सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम, जीपीएससह, स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स आणि मायक्रो- हायब्रिड प्रणाली या नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत.  नव्या टीयूव्ही ३०० ला शक्तिशाली एमएचएडब्ल्यूके इंजिनची जोड देण्यात आली असून त्याची क्षमता १०० बीएचपी आणि २४० एनएम टॉर्क इतकी आहे. यात कुशन सस्पेंशन तंत्रज्ञान आणि ऑप्टिमाइज्ड राइड हाइट ही प्रणाली वापरण्यात आली आहे. टीयूव्ही ३०० ची चासिस महिंद्रा स्कॉर्पिओवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.

गाडी सात रंगांमध्ये उपलब्ध असून त्यात हायवे रेड आणि मिस्टिक कॉपर या दोन नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या व्हेरिएंटशिवाय (टीफोरप्लस, टीसिक्सप्लस, टीएट आणि टीटेन) टी१०(ओ) चा पर्यायी पॅकही उपलब्ध आहे.

टीव्हीएस स्कूटी दोन नव्या रंगांत

टीव्हीएस मोटरच्या टीव्हीएस स्कूटी या ब्रँडने २५ वर्षे पूर्ण केली असून यानिमित्ताने टीव्हीएस स्कूटी दोन नव्या रंगांत सादर केली आहे. टीव्हीएस स्कूटी पेप प्लसच्या नव्या आवृत्तीमध्ये, २५व्या वर्धापन दिनानिमित्तच्या लोगोचा आणि नव्या ग्राफिकचा समावेश आहे. टीव्हीएस स्कूटी पेप प्लसमध्ये ८७.८ सीसी, एअर-कूल्ड सिंगल सिलिंडर इकोथ्रस्ट इंजिन असून ते ४.९ पीएस पॉवर व ५.८ एनएम टॉर्क निर्माण करते. मोबाइल चार्जर सॉकेट, साइड स्टँड अलार्म, अंडर-सीट स्टोअरेज हूक, डीआरएल ओपन ग्लोव्ह बॉक्स आणि ‘ईझी’ स्टँड तंत्रज्ञान ही गाडीची वैशिष्टय़े आहेत. टीव्हीएस झेस्ट ११० मध्ये सिंगल सिलिंडर, फोर-स्ट्रोक, एअर-कूल्ड १०९.७ सीसी सीव्हीटीआय इंजिन आहे. नव्या रंगांव्यतिरिक्त, टीव्हीएस स्कूटी पेप प्लस तीन संचांअंतर्गत समाविष्ट केलेल्या रंगांच्या पाच थीममध्ये उपलब्ध आहे. स्टार्लेट शृंखलेत काळय़ा व पर्पल या रंगांमध्ये मिळेल. इकोस्मार्ट शृंखलेमध्ये नेरो ब्लू व नेरो ब्राऊन संकल्पनेत आहेत, तर बेबलिशिअस शृंखलेमध्ये गुलाबी रंग आहे.