05 August 2020

News Flash

स्कूटरचे‘स्मार्ट’अवतार

चेतक १९७२ मध्ये प्रथम रस्त्यावर आल्यानंतर ३४ वर्षे बाजारात राहून तिने खरेदीदारांना भुरळ घातली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅक्टिव्हा, ज्युपिटर, चेतक.. भारतीय स्कूटर बाजारातील हे आघाडीचे ब्रॅण्ड. यातल्या प्रत्येक ब्रॅण्डने एक काळ गाजवला (आजही गाजवताहेत!).

पण तरीही भविष्यासोबत येणाऱ्या आव्हानांमध्येही आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी या ब्रॅण्डच्या स्कूटरमध्ये कालसुसंगत बदल झाले. स्कूटरच्या विश्वासार्ह ब्रॅण्डला स्मार्ट तंत्रज्ञानाची जोड देऊन निर्माण करण्यात आलेले हे ब्रॅण्ड ग्राहकांना पसंत पडतील का, हेच आता पाहावे लागेल.

वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीसदृश परिस्थितीचा धसका घेत बहुतेक सर्वच कंपन्यांनी आपले उत्पादन कमी केले आहे. त्याच वेळी ग्राहकांची मागणी असलेली किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली उत्पादने बाजारात आणण्याचे धारिष्टय़ही कंपन्या दाखवत आहेत.  सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणारा खरेदीदारही तंत्रस्नेही व चोखंदळ झाला आहे. या तंत्रस्नेही ग्राहकांच्या पसंतीला वाहन उतरले की तो पैशांचाही विचार करीत नाही. त्यामुळे कार उत्पादनात गेल्या काही दिवसांपासून अचानक बदल होताना दिसत आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये विशेष लोकप्रिय असलेला ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल’ किंवा एसयूव्ही हा वाहनप्रकार सध्या भारतात लोकप्रिय ठरत आहे. गेल्या वर्षभरात एसयूव्ही प्रकारातील वाहनांना खरेदीदारांनी पसंती दिली आहे.

त्याचप्रमाणे दुचाकींच्या मागणीतीही युवा खरेदीदारांची पसंती पाहता अनेक बदल होत आहेत. स्कूटरमध्ये गेल्या आठवडाभरात अनेक स्कूटर बाजारात नव्याने आल्या आहेत. त्यात तीन स्कूटरचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कारण खरेदीदारांना आतापर्यंत भुरळ घातली आहे. त्यात पहिली म्हणजे बजाची चेतक, होंडाची अ‍ॅक्टिव्हा व टीव्हीएसची ज्युपिटर. या तिन्ही स्कूटर आता नव्या रूपात, अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत बाजारात दाखल झाल्या आहेत.

चेतक १९७२ मध्ये प्रथम रस्त्यावर आल्यानंतर ३४ वर्षे बाजारात राहून तिने खरेदीदारांना भुरळ घातली आहे. १९९० च्या दशकातील, ‘हमारा कल, हमारा आज.. बुलंद भारत की बुलंद तस्वीर.. हमारा बजाज.. हमारा बजाज..’ ही जाहिरात आजही मनामनात आहे. स्कूटर खरेदी करायची म्हटले की बजाजची चेतक, मग वर्षभर थांबायला लागले तरी चालेल, अशी खरेदीदारांची मानसिकता होती. १९७२ मध्ये चेतक बाजारात आली आणि ३४ वर्षे तिने बाजारात आपले स्थान कायम ठेवले. मात्र २००६ मध्ये कंपनीने अचानक चेतकचे उत्पादन बंद करीत मोटारसायकलवर लक्ष केंद्रित केले. तेव्हापासून चेतकची प्रतीक्षा ग्राहकांना होती. ती नुकतीच संपली.

बजाजने विजेवर चालणारी चेतक बाजारात आणली आहे. एकदा चार्जिग केल्यावर ९५ किलोमीटपर्यंत चालणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे असून जानेवारीपासून प्रत्यक्षात विक्री केली जाणार आहे. नव्या जुन्याचा मिलाप करून आकर्षक रूपात चेतक सादर करण्यात आली आहे. सहा आकर्षक रंगांत ती असून घोडय़ाच्या नालेच्या आकाराचे एलईडी हेडलाइट आहेत. डेटा कम्युनिकेशन, सुरक्षेची काळजी घेतली असून खरेदीदारला कनेक्ट राहण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. चेतक मोबाईल अ‍ॅपमुळे गाडी व रेकॉर्डबद्दल सर्व माहिती यात मिळते. आता तिचा नवा अवतार अधिक सुबक, फिक्स बॅटरी असणारा, डिस्क ब्रेक असणारा आणि टय़ूबलेस टायरसहित असणार आहे.

स्मार्ट कनेक्ट

ब्लूटूथ कनेक्टिविटी याबरोबरच डिजिटल इन्स्ट्रमेंट क्लस्टर दिलेले आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून चालक आपला स्मार्टफोन याला जोडू शकतो. त्यामुळे येणारे फोन, मेसेज याच्यासह काही महत्त्वाची माहिती यावर दाखवली जाईल. याशिवाय बॅटरची स्थिती, वेग याही दिसणार आहेत.

लिथिअम इऑन बॅटरी

चेतकमध्ये ६७ रेटेड हाय टेक लिथिअम लिथिअम इऑन बॅटरी दिली आहे. ती घरगुतीही चार्ज करता येते. तसेच घरगुती चार्जिग स्टेशनही योग्य दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. इको आणि स्पोर्ट असे दोन मोड दिले असून ती एकदा चार्ज केली की इको मोडमध्ये ९५ किलोमीटर तर स्पोर्ट मोडमध्ये ८५ किलोमीटर चालते, असा कंपनीचा दावा आहे.

बीएस ६ होंडा अ‍ॅक्टिव्हा

स्कूटरमधील होंडाचा ब्रँड असलेली अ‍ॅक्टिव्हा काही पर्यावरणपूरक बदलांसह आधुनिक सुविधांसह नव्याने सादर केली आहे. बीएस ६ पर्यावरणपूरक १२५ सीसी इंजिनसह स्मार्ट पॉवर तंत्रज्ञान वापरले आहे. लुकमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. पुढील बाजूस अ‍ॅप्रन आणि साइड पॅनल्सवर क्रोम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 12:13 am

Web Title: article on smart scooter abn 97
Next Stories
1 व्हिंटेज वॉर : वाफेवर चालणारी मोटार
2 चेमदेव  डोंगर
3 टेस्टी टिफिन : सफरचंद आणि बदाम सूप
Just Now!
X