18 September 2020

News Flash

ट्रिपटिप्स : उन्हाळ्यातील भटकंती

कूर्ग हे कर्नाटकातील थंड हवेचं ठिकाण हल्ली पर्यटकांना आकर्षित करू लागलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुट्टय़ांचे दिवस जवळ आल्यामुळे सर्वानाच भटकंतीचे वेध लागले आहेत. पण सुट्टय़ा आणि उन्हाळा एकत्रच सुरू होतो, त्यामुळे पर्यटनस्थळांच्या यादीतील अर्धीअधिक ठिकाणं तर बादच होतात. मग गारव्याच्या शोधात सर्वजण हिमालयाकडे धाव घेतात. साहजिकच या काळात तिथेही प्रचंड गर्दी होते आणि तिथेही उन्हाळा सुरू झाल्यामुळे बर्फ वगैरे कल्पना धुळीस मिळतात. हे टाळायचे असेल, तर थोडं दक्षिणेकडे वळायला हरकत नाही. दक्षिण भारतात अनेक अशी थंड हवेची रम्य पर्यटनस्थळं आहेत, जिथे उन्हाचा कडाका फारसा जाणवणार नाही आणि गर्दीपासून दूरही राहता येईल.

तामिळनाडूतील येरकौड हे तुलनेने शांत पर्यटनस्थळ आहे. इथल्या विस्तीर्ण तलावाकाठी आणि कॉफी किंवा मसाल्यांच्या मळ्यात फिरताना उन्हाचा तडाखा जाणवणारही नाही. कूर्ग हे कर्नाटकातील थंड हवेचं ठिकाण हल्ली पर्यटकांना आकर्षित करू लागलं आहे. मात्र, अद्याप तिथे खूप गर्दी झालेली नाही. कॅम्पिंग, ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथल्या नागरहोल राष्ट्रीय उद्यानात वाघ, हत्ती, सांबर मुक्तपणे भटकताना दिसतात. आंध्र प्रदेशातील हॉर्सली हिल्स हे निवांतपणे वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. गवताळ रान, सरोवर, दाट जंगलं, टेकडय़ा हे सारं काही अनुभवता येईल असं ठिकाण म्हणजे कोडाइकॅनल. इथे नौकानयन, ट्रेकिंग, सायकलस्वारी करण्यात वेळ आनंदात निघून जातो. दक्षिणेतलं पर्यटकप्रिय ठिकाण म्हणजे अंदमान. इथल्या अतिशय शांत किनाऱ्यांवरील भटकंती, सेल्युलर तुरुंगातील स्मारक, राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चिडिया टापू पाहणे, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग करणे, पारदर्शी तळ असलेल्या बोटीतून सागरीसृष्टी पाहणे हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:11 am

Web Title: article on summer wandering
Next Stories
1 हिमाचली सिदू
2 टेस्टी टिफिन : बाजरी डोसा
3 शहरशेती : गॅलरीतील फुलझाडे
Just Now!
X