अनिल पंतोजी

सायकल क्रॉसिंग

हे चिन्ह पुढे सायकल मार्ग आहे असे दर्शविते. काही रस्त्यांवर सायकलस्वारांची वर्दळ असते अशा ठिकाणी या चिन्हाचा वापर केला जातो. वाहनचालकांनी अशा रस्त्यावर काळजीपूर्वक वाहने चालवावीत.

असुरक्षित रेल्वे क्रॉसिंग

हे चिन्ह पुढे असुरक्षित रेल्वे क्रॉसिंग आहे हे दर्शविते. या ठिकाणी रेल्वे गेटची बांधणी नसते आणि सुरक्षारक्षकदेखील नसतो. चालकाने स्वत: उतरून रेल्वे येत नसल्याची खात्री करूनच रेल्वेलाइन पार करावी. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेलाइन पार करताना गिअर बदलू नये.

माहिती देणारे चिन्ह

आपणास पुढे कुठे, कसे जावयाचे आहे याबाबत ही चिन्हे मार्गदर्शन करीत असतात. ही चिन्हे निळ्या रंगात आयताकृती असतात. रस्त्यावर असणारे चौक, मुक्कामाची ठिकाणे, याचे अंतर व रस्त्यावर असणाऱ्या सुख-सुविधा इ. बाबत माहिती या चिन्हांद्वारे दिली जाते. या चिन्हांमुळे प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होते.

आगाऊ दिशा निर्देशन

हे चिन्ह कोणता रस्ता कोणत्या गावाकडे जातो आहे हे दर्शवितो. हे चिन्ह नेहमी काटरस्त्याच्या आधी दर्शविले जाते.

स्थान निर्देशन चिन्ह

हे चिन्ह कोणते गाव कोणत्या दिशेला आणि किती कि.मी. अंतरावर आहे हे दर्शविते.