25 September 2020

News Flash

शहरशेती : कंद फुलझाडे

आपल्या गॅलरीत आपण शोभिवंत फुले देणाऱ्या कंदांची लागवड करू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

आपल्या गॅलरीत आपण शोभिवंत फुले देणाऱ्या कंदांची लागवड करू शकतो. त्यांचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे हंगामी फुले येणारे कंद आणि एकदाच लागवड करून जवळपास वर्षभर फुले येणारे कंद. हंगामी फुलांत फक्त त्या हंगामातच फुले येणारी झाडे असाही एक प्रकार आहे.

* लागवड करून एक-दोन वर्षे फुले देणारे कंद. उदा. निशिगंध, सोनटक्का

* फक्त हंगामात फुले येणारी झाडे उदा. – हिवाळ्यात फुलणारे डेलिया, पावसाळ्यात बहरणारी लिली

* उन्हाळ्याच्या शेवटी येणारी. उदा. – अमर/ ट्रम्पेट लिली, फायरबॉल, मे फ्लॉवर

* वर्षभर वाढणारी, फुले आल्यानंतर कंद कापून ठेवून पुन्हा लागवड करता येणारी. उदा. – ग्लॅडिओला

काही कंदांना सुप्तावस्था असते, तर काही कंद वाढून नवीन झाडे तयार होतात. त्यांना फुले येत राहतात.

निशिगंध (टय़ुबरोझ) – हा वर्षभर फुलत राहणारा कंदफुलाचा प्रकार आहे. याचे तीन प्रमुख प्रकार आहेत. एकेरी फुले, डबल फुले आणि व्हेरिगेटा. एकेरी फुलांना थोडा जास्त सुगंध असतो. साधारण सुपारीपेक्षा मोठय़ा किंवा लिंबाएवढय़ा कंदाला लवकर फुले येतात. फुलांचा दांडा आल्यावर खालून वरच्या दिशेने फुले उमलत जातात. एकेरी प्रकार शक्यतो सुटय़ा फुलांसाठी वापरतात. तर डबल फुलांचा निशिगंध पुष्पगुच्छांमध्ये कट फ्लॉवर म्हणून वापरतात.

पाण्याचा सहज निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय घटक असणारी मती चांगली. साधारण वर्षभराने कंद काढून १५-२० दिवस सावलीत ठेवावेत. नंतर कंद वेगवेगळे करून लागवड करावी. कंद साधारण सुपारीएवढे तरी असावेत. कंद त्याच्या उंचीएवढय़ा खोल खड्डय़ात लावावा. उथळ लावल्यास त्याला पिल्ले जास्त येतात. कंदांची लागवड करण्यापूर्वी जीवामृत, ट्रायकोडर्मा किंवा गोमूत्राची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे झाड लवकर उगवते आणि निरोगी राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 12:23 am

Web Title: article on tubers flowers
Next Stories
1 काही उणे, काही दुणे
2 घरातलं विज्ञान : चहा पाण्यात आणि फोडणी तेलातच का?
3 परदेशी पक्वान्न : मँगो सालण
Just Now!
X