21 September 2020

News Flash

नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही

एसयूव्हीना सध्या जबरदस्त मागणी आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्पोर्ट्स युटीलिटी व्हेईकल अर्थात एसयूव्हीना सध्या जबरदस्त मागणी आहे. कारणही तसंच आहे. या गाडय़ा पॉवर, पिकअप, स्टाइल याबाबत दमदार असल्यानेच अनेक संभाव्य ग्राहक कारऐवजी एसयूव्हीसना पसंती देत आहेत. संभाव्य स्पर्धा लक्षात घेऊन टाटा मोटर्सने लाँच केलेल्या नेक्सॉनमध्ये देण्यात आलेली अनेक फीचर्स ही पहिल्यांदाच या सेगमेंटमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळेच स्टाइल, परफॉर्मन्स, कम्फर्ट आदींचा आढावा आम्ही घेतला आहे.

डिझाइन

आपल्यावर (टाटा मोटर्सच्या कारवर) असणारी कॅब कार उत्पादक ही छबी पुसण्यासाठी टाटा मोटर्स करीत असलेले प्रयत्न कंपनीने लाँच केलेल्या टियागो, टिगॉर, हेक्सा या गाडय़ांमध्ये दिसत आहे आणि नेक्सॉनही त्याला अपवाद नाही. पूर्वीच्या टाटा मोटर्सच्या कार आणि इम्पॅक्ट डिझाइन फिलॉसॉफीवर आधारित नवीन कार पाहिल्यावरच या कार टाटा मोटर्सने बनविल्या आहेत का, असा प्रश्न पडतो. पण, टाटा मोटर्सने ग्राहकांचे समाधान करण्यासाठी आणि आपले वाहन उजवे ठरण्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्ट आहे. कंपनीने नेक्सॉनचे कॉन्सेप्ट मॉडेल काही वर्षांपूर्वी सादर केले होते आणि प्रत्यक्ष मॉडेलमध्ये फार मोठा फरक नाही. पूर्वीच्या एक्स वन प्लॅटफॉर्मवर आधारित ही गाडी आहे. पण, पाहताच क्षणी अप्रतिम, अशीच प्रतिक्रिया येऊ  शकते. टिगॉर, टियागो व हेक्साप्रमाणे नेक्सॉनला हनीकोम्ब डिझाइनचे ग्रिल दिले असून, दोन्ही बाजूला प्रोजेक्टर हेडलॅम्प डे टाइम एलईडी रनिंग लाइटसह आहेत. टर्न ऑन इंडिकेटर साइड मिरमध्ये समाविष्ट केले आहेत.

इंटीरियर

बाह्य़रूपाबरोबर अंतर्गत रचना इंटीरियरही सुंदर असणे आवश्यक असते. टाटा मोटर्सने नेक्सॉनचे इंटीरियरही उत्तमच केले आहे. कारण स्पर्धक असणाऱ्या गाडय़ांच्या अंतर्गत रचनेसाठी वापरण्यात आलेले मटेरियल उच्च दर्जाचे नाही आणि त्याचे फिनिशिंगही प्रीमियम वाटत नाही. नेक्सॉनचे इंटीरियर डिझाइन करताना अनेक बारीक-बारीक गोष्टींचा विचार केला आहे. उदाहरणदाखल ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला गिअर लिव्हरच्या मागे एक स्लायडर कप्पा दिला आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी बसू शकतात. तसेच, उजव्या हाताला आर्मरेस्टच्या (डाव्या हातालाही) बाजूला एक कप्पा करण्यात आला आहे. यामध्ये सुटे पैसे वा वॉलेट ठेवता येऊ  शकते. त्याचप्रमाणे डॅशबोर्डच्या खाली व गिअरलिव्हरच्या पुढे चार्जिग पॉइंट दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोबाइल चार्जिगसाठी वा नुसताच ठेवता येऊ  शकतो. ग्लोव्हबॉक्स असून काढता येऊ शकणाऱ्या ट्रेसह दिला आहे आणि यामध्ये लाइटची सुविधा आहे. इंटीरियर डय़ुएल टोनमध्ये (ब्लॅक, बेईज) असून, काही ठिकाणी स्लेट रंगाचे फिनिशिंगही आहे. ड्रायव्हरसीटच्या शेजारील सीटच्या खाली स्टोरेजसाठी ट्रे दिला आहे.

हार्मन कार्डनची आठ स्पीकर असणारी इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली असून, नॅव्हिगेशन, अँड्रॉइड ऑटो मल्टिफंक्शनल स्क्रीन दिला असून, तो लक्झरी सेगमेंटमधील कारची आठवण करून देतो. मात्र, ही सुविधा फक्त निवडक मॉडेल्समध्ये आहे. पुश बटन स्टार्ट असणाऱ्या मॉडेलसाठी वॉटर प्रूफ रिस्ट बँड दिला आहे. यामुळे कारची पुशबटन की बरोबर घेऊन जाण्याची गरज नाही. रिस्ट बँड गाडीच्या सेन्सरला लावला की कारचे दार उघडता येते. स्टिअरिंगवर वर-खाली करता येत असून, सर्व ऑडियो कंट्रोल देण्यात आले आहेत. ड्रायव्हर सीट उंच असल्याने दृश्यमानता चांगली आहे.

इंजिन

पेट्रोल मॉडेल 1.2 लिटरचे म्हणजे बाराशे सीसीचे टबरे इंजिन असून, ते 110 बीएचपीचे आहे. तीन सिलिंडरचे इंजिन असूनही त्याचे फायरिंग तुलनेने स्मूथ आहे. तसेच, इंजिन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड आहे. इलेट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग असल्याने ट्रॅफिकमध्ये गाडी चालविताना जास्त ताकद वापरावी लागत नाही.

स्पेसिफिकेशन व मायलेज

नेक्सॉनच्या सर्व मॉडेल्सना अँटी ब्रेकिंग सिस्टिम अर्थात एबीएस व इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्यूश अर्थात ईबीडी, डय़ूएल एअर बॅग दिले आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएलएस, एलईडी टेल लॅम्प, अलॉय व्हील्स, ओआरव्हीएम्स, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, रिअर स्प्लीट सीट, ड्रायव्हर रिअस अस्टिस्ट कॅमेरा आदी दिले आहे. नेक्सॉन्स पेट्रोलचे मायलेज प्रति लिटर १६ किमी आहे.

काय करावे?

स्पेशियस केबिन, प्रीमियम फीचर्स, उत्तम रायडिंग-हँडलिंग व स्टॅबिलिटी हे नेक्सॉनच्या जमेच्या बाजू असून, किंमतही वास्तवी आहे. डिझेल इंजिन मॉडेल बजेटच्या बाहेर असणाऱ्यांसाठी तसेच दिवसाला १० ते ३० किमी रनिंग असणाऱ्यांसाठी पेट्रोल मॉडेल चांगले आहे. पण, मायलेज प्रेमींसाठी पेट्रोल व्हर्जनपेक्षा डिझेलचा विचार केलेला बरा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:38 am

Web Title: articles in marathi on tata nexon sport utility vehicle
Next Stories
1 कोणती गाडी घेऊ?
2 हिमालयाच्या सावलीत..
3 पहिलावहिला विमान प्रवास
Just Now!
X