21 February 2019

News Flash

वाहनक्रांतीच्या दिशेने..

‘ऑटो एक्स्पो’..भारतामधील वाहन क्षेत्रातील सगळ्यात मोठं प्रदर्शन.

‘ऑटो एक्स्पो’..भारतामधील वाहन क्षेत्रातील सगळ्यात मोठं प्रदर्शन. २० पेक्षा अधिक देशांमधून सहभागी झालेल्या १२०० पेक्षा अधिक वाहन उत्पादक कंपन्या. या कंपन्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखत इलेक्ट्रॉनिक, हायब्रीड वाहनांचे तसेच सर्व नवीन गाडय़ांचे सादरीकरण केले. २०३० पर्यंत सर्व वाहने विजेवर चालवण्याच्या सरकारच्या धोरणांना प्रतिसाद देत अनेक कंपन्यांनी या वाहन मेळाव्यात आपली विजेवरील वाहने सादर केली. या मेळाव्यातील काही महत्त्वाच्या वाहनांचा आढावा.

बीएमडब्ल्यू

जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने आय८ रोडस्टर हायब्रीड स्पोर्ट्स कारला सादर केले. कंपनीने यामध्ये अनेक वैशिष्टय़ांचा समावेश केला आहे. तिच्यामध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन, एक इलेक्ट्रिक मोटरसह देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक मोटरची क्षमता १४३ पीएस आणि टॉर्क २५३ एनएम आहे. इलेक्ट्रिक मोटरला ३४ एएच बॅटरीपासून ऊर्जा मिळेल, तर पेट्रोल इंजिनची क्षमता २३१ पीएस आणि टॉर्क ३२१ एनएम आहे. तिचा सर्वाधिक वेग २४८ किमी प्रति तास असेल आणि फक्त ४.६६ सेकंदामध्ये ती ० ते १०० किमीचा वेग घेईल. याच्यासह कंपनीने अन्य प्रमुख मॉडेलही सादर केली असून, बाइक मोटररॅड जी एस ३१०, बीएमडब्ल्यू एफ ७५० जीएस, बीएमडब्ल्यू एफ ८५० जीएस आणि ३१० आर एक्सेलला सादर केले. तसेच कंपनीने या वेळी ‘आय३ एस’ या इलेक्ट्रिक कारला सादर केले.

ह्य़ुंदाई

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी असलेल्या ह्य़ुंदाईने आपल्या प्रीमियम कॉम्पॅक्ट हॅचबॅक ‘एलिट आय २०’ला दाखल केले. या कारची किंमत दिल्लीमध्ये ५.३४ लाख ते ९.१५ लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यासह कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार आयोनिक सादर केली.

२०२० पर्यंत भारतीय बाजारपेठेत ९ नवीन उत्पादने दाखल करणार असल्याचे कंपनीने या वेळी जाहीर केले. यामध्ये विजेवर चालणाऱ्या एका वाहनाचा समावेश आहे.

किआ

संपूर्ण जगामध्ये म्हणजे तब्बल १८० देशांमध्ये विस्तार असलेल्या दक्षिण कोरियातील ‘किआ’ या कंपनीने प्रथमच या वाहन मेळाव्यात जागतिक स्तरावरील तब्बल १६ कार सादर केल्या. यामध्ये सादर करण्यात आलेली ‘मेड फॉर इंडिया’ एसपी कॉन्सेप्ट कार भारतामध्ये पुढील वर्षांच्या अखेपर्यंत सादर करण्यात येणार आहे. हे वाहन त्यांच्या आंध्र प्रदेशमधील उत्पादन प्रकल्पामध्ये तयार करण्यात येणार आहे. कंपनीने प्रकल्पासाठी १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, प्रति वर्ष ३ लाख वाहनांचे उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान सर्व वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याचा कंपनीचा मानस आहे. यामध्ये हॅचबॅकपासून एसयूव्हीपर्यंतचा समावेश आहे.

रेनॉ

फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी रेनॉने वाहन मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक संकल्पनेवर आधारित असणाऱ्या ट्रेझर आणि झोई ई स्पोर्ट्स या दोन वाहनांचे सादरीकरण केले. या वेळी कंपनीने फॉम्र्युला वन कार आर.एस. १७, क्विड सुपर हिरो आवृत्तीही प्रदर्शनामध्ये सादर केली. दोन आसने असणारी ट्रेजर ४.७ मीटर लांब आणि २.१८ मीटर रुंद तसेच १.०८ मीटर उंच आहे. झोई ई-स्पोर्टला हलक्या कार्बन फायबरपासून बनवण्यात आले आहे. त्यामुळे ती फक्त ३.२ सेकंदांमध्ये १०० किमी प्रति तासाचा वेग घेऊ शकते.

स्विफ्ट

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन स्विफ्टचे या वेळी सादरीकरण करण्यात आले. तिसऱ्या पिढीतील या स्विफ्टचे बुकिंग जानेवारीमध्येच सुरू करण्यात आले आहे. या कारची किंमत ४.९९ लाख रुपयांपासून ठेवण्यात आली आहे. नव्या स्विफ्टसाठी आत्ताच सहा ते आठ आठवडय़ांचा प्रतीक्षा कालावधी देण्यात आला आहे.

होंडा

१. नेक्स्ट जनरेशन होंडा अमेझ २. होंडा सीआरव्हीची पाचवी पिढी (प्रथमच डिझेलमध्ये) ३. होंडा सिव्हिक (पाचवी पिढी). या गाडय़ा चालू वर्षांमध्येच भारतामध्ये उपलब्ध करण्यात येतील.

होंडाची प्रदर्शनातील महत्त्वाची मॉडेल्स.

  • होंडा स्पोर्ट्स ईव्ही कन्सेप्ट
  • होंडा निऊ व्ही
  • क्लॅरिटी फ्युएल सेल (होंडाचे सर्वाधिक प्रगत शून्य उत्सर्जन वाहन)
  • युनी क्युब बीटा
  • होंडा सेन्सिंग तंत्रज्ञान

टाटा मोटर्स

कंपनीने खासगी आणि सार्वजनिक वाहतूक o्रेणीमध्ये पहिल्या दिवशी सहा विजेवर चालणाऱ्या वाहनांचे अनावरण केले. याच वेळी कंपनीकडून लक्झरी एसयूव्ही o्रेणीतील एच ५ एक्स कन्सेप्ट आणि ४५ एक्स कन्सेप्टही प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. या वेळी कंपनीकडून स्पोर्ट्स कारमधील नवीन ब्रँड ‘टॅमो’ सादर केले. व्यावसायिक o्रेणीमध्ये टाटाने आपले टाटा इन्ट्रा हे नवीन वाहन सादर केले.

टाटा टिगोर

टाटा मोटर्सने या वेळी विजेवर चालणाऱ्या टिगोरचे सादरीकरण केले. इलेक्ट्रिक टिगोरला सानंदच्या प्रकल्पामध्ये तयार करण्यात आले आहे. या कारचे सर्वाधिक वेग १०० किमी प्रति तास आहे. एका वेळेस चार्ज केल्यानंतर ही गाडी १३० किलोमीटरचे अंतर पार करू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. वेगवान चार्जरमुळे ती ३० मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज होते.

सुझुकी मोटरसायकल

साहसी पर्यटनासाठी मोटरसायकल निर्मिती करणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या सुझुकी मोटरसायकलने या वेळी ‘व्ही स्ट्रोम ६५०’ सादर केली. व्ही स्ट्रोम आवृत्ती जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. सुझुकीने बर्गमॅन स्कूटरही सादर केली. जगभरात १२५ ते ६३८ सीसीपर्यंत ही स्कूटर उपलब्ध आहे.

टीव्हीएस

टीव्हीएसने आपल्या अपाचे आरटीआर 200 एफआय, टीव्हीएस क्रिऑन आणि टीव्हीएस झेप्पेलिन या मोटरसायकल सादर केल्या. यामधील टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ही इथेनॉलवर आधारित असून, ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल आहे. यामुळे प्रदूषणाला मोठय़ा प्रमाणात आळा बसेल आणि तेल आयातीमध्ये घट होऊन देशाबाहेर जाणारा पैसा देशातच राहील. देशामध्ये मोठय़ा प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होते. त्यामुळे पेट्रोलप्रमाणेच जर इथेनॉल पंप निर्माण केले तर या मोटरसायकलला भविष्यात मोठी मागणी वाढेल, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

हिरो मोटोकॉर्प

कंपनीने आपल्या माइस्ट्रो एज आणि डय़ुएट या दोन स्कूटर सादर केल्या. नवीन माइस्ट्रो एजमध्ये ११० सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. डय़ुएटमध्येही ११० सीसीचे इंजिन देण्यात आले असून, मेटल बॉडी हे तिचे वैशिष्टय़ आहे.

यामाहा

कंपनीने बहुप्रतीक्षित ‘वायझेडएफ-आर १५’ मोटरसायकलचे सादरीकरण केले आहे. वायझेडएफ-आर १५ ची किंमत भारतामध्ये १.२५ लाख रुपये (एक्स शोरूम, नवी दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या मोटरसायकलच्या इंजिनमध्ये नवीन फ्युअल इंजेक्शनसह १५५.१ सीसी सिंगल सिलिंडर कूल्ड फोर स्ट्रोक एसओएचसी इंजिन देण्यात आले आहे जे १० हजार आरपीएमला १९.७ बीएचपी पॉवर आणि ८५०० आरपीएमला १४.७ एनएमचा पिक टॉर्क  निर्माण करते.

टोयोटा

टोयोटाने आपल्या सेडान कार ‘टोयोटा यारिस’ला भारतामध्ये दाखल केले. जपानी कंपनी टोयोटा आणि किलरेस्कर ग्रुपची संयुक्त कंपनी असलेल्या यारिसला या वर्षांच्या एप्रिलपर्यंत बाजारात सादर करण्यात येणार आहे. तेव्हापासून या गाडीसाठी बुकिंग घेण्यात येणार आहे. यारिसची स्पर्धा प्रामुख्याने होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ आणि ह्य़ुंदाईच्या वर्नासोबत आहे.

मर्सिडीज बेन्झ

जर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेन्झने आपली सर्वात महाग कार ‘मेबॅच एस ६५०’चे अनावरण केले. ही देशातील पहिली लक्झरी कार आहे, ज्यामध्ये बीएस-६ इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने या कारची किंमत २.७३ कोटी रुपये ठेवली आहे. याच वेळी कंपनीने मर्सिडीज एएमजी पेट्रोनास फॉम्र्युलासह इतर १३ उत्पादने सादर केली. ज्यामध्ये कंपनीच्या कन्सेप्ट ईक्यूचाही समावेश आहे. तसेच कंपनीने ई क्लास ऑल टर्ेेन सेडानला सादर केले आहे.

chandrakant.dadas@expressindia.com

First Published on February 10, 2018 12:33 am

Web Title: auto expo 2018 vehicle revolution in india bmw hyundai swift