19 April 2019

News Flash

हसत खेळत कसरत : पाठदुखीपासून मुक्ती

विशेष म्हणजे या व्यायामाने पोटाचेही स्नायू बळकट होतात.

(संग्रहित छायाचित्र)

मान आणि पाठीच्या वरील बाजूस असलेले स्नायू मजबूत करण्यासाठी बेंट नी सीट-अप व्यायाम केला जातो. यास क्रंचेस असेही म्हटले जाते. या व्यायामाने पाठीचे स्नायू बळकट होत असल्याने पाठदुखीपासून मुक्ती मिळते. विशेष म्हणजे या व्यायामाने पोटाचेही स्नायू बळकट होतात.

कसे कराल?

  • जमिनीवर पाठीवर झोपा. पाय गुडघ्यातून वाकवा. पायाच्या टाचेपासून कंबरेचे अंतर १२ ते १८ इंच असावे.
  • दोन्ही हात डोक्याखाली घेऊन हाताची बोटे एकमेकांत गुंफवा.
  • आता हाताच्या साहाय्याने डोके आणि पाठ वर उचला. (लक्षात ठेवा, केवळ पाठीचा वरील भागच वर उचला.)
  • डोके वर उचलताना दीर्घ श्वास घ्या आणि डोके खाली घेताना श्वास सोडा. (श्वास घेताना तो पोटापासून घ्या.)
  • डोके वर उचलल्यानंतर ते खाली सावकाश घ्या. जर वेगाने डोके वर उचलले आणि खाली आणल्यास मान दुखवू शकते.
  • डोक अधिक वर उचलू नका. अनेक जण डोके छातीवर टेकवण्याचा प्रयत्न करतात. ते चुकीचे आणि धोकादायक आहे.

First Published on August 15, 2018 1:29 am

Web Title: back pain exercises