News Flash

सांगे वाटाडय़ा : सुसज्ज ‘पोतडी’

रिकामी झालेली जागा आपण खरेदी केलेल्या नव्या वस्तूंना देता येते.

बॅग भरताना काही घोळ झाला, तर एवढे पैसे आणि सुट्टी खर्च करून केलेल्या प्रवासाची सगळी मजा जाऊ शकते. पण एकदा प्रवासाची बॅग भरण्याचं कौशल्य अवगत केलं की भलीमोठी सुटकेस असो वा छोटीशी सॅक, ती तुमच्या प्रवासाचा आनंद अबाधित राखणारी, सर्व गरजा त्वरित भागवणारी जादूची पोतडी ठरू शकते.

  • बॅग भरताना एकावर एक कपडे न रचता ते घडी घालून रोल करून बॅगेत भरावेत, त्यामुळे जागा वाचते आणि गरज असल्यास तुम्ही थोडे जास्ती कपडे नेऊ शकता.
  • तुम्ही शूज जर बॅगमध्ये पॅक करून नेणार असाल तर पारदर्शक झिप लॉक पाऊचमध्ये सॉक्सचे जोड गुंडाळून शूजमध्ये भरून ठेवा. त्यामुळे सॉक्ससाठी वेगळी जागा द्यावी लागत नाही आणि सॉक्स बॅगच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडल्यामुळे होणारी शोधाशोध टाळता येते.
  • शॅम्पू, लोशन किंवा नाइट क्रिम्स छोटय़ा बॉटल्समध्ये ओतून सोबत न्याव्यात. असे केल्यामुळे सामानाचे वजन कमी राहते. चेकइन करताना अडथळा येत नाही आणि वापरून झाल्यावर त्या बॉटल्स तिथेच टाकून देता येतात. रिकामी झालेली जागा आपण खरेदी केलेल्या नव्या वस्तूंना देता येते.
  • हॉटेलमध्ये असाल आणि शू पॉलिशसाठी पर्याय उपलब्ध नसेल तर आणीबाणीच्या वेळी हॉटेलच्या बाथरूममधील शॅम्पू कंडिशनर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याने शूजना उत्तम चमक येते.
  • वेगवेगळ्या देशांतील चार्जिग पॉईंट्स वेगवेगळे असतात. काही ठिकाणी गोल पिन्स तर काही ठिकाणी चपट पिन्ससाठी सॉकेट्स असतात. तेव्हा परदेश प्रवासासाठी युनिव्हर्सल अडॅप्टर जरूर सोबत न्यावा.
  • फोटो काढणे, गाणी ऐकणे, व्हिडीओ शूट करणे यामुळे मोबाइल फोनची बॅटरी खूप लवकर उतरते. त्यामुळे पोर्टेबल चार्जर जरूर सोबत बाळगावा. जो आठवणीने दररोज रात्री चार्ज करावा.

writersmruti@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 2:14 am

Web Title: bag packing
Next Stories
1 फेकन्युज : दिल्लीतील भूकंपाचा बागुलबुवा!
2 ‘वायफाय’ला पर्याय ‘लायफाय’चा!
3 न्यारी न्याहारी : पोळीच्या नूडल्स
Just Now!
X