• साहित्य : पिकलेली ३ केळी, अर्धा कप सुके खोबरे किसून, १ लिंबू, १ कप व्हॅनिला, १ चमचा बदाम बारीक केलेले.
  • कृती : खोबऱ्याचा कीस अगदी तांबूस होईपर्यंत छान भाजून घ्या. केळ्याचे काप करा. त्याला लिंबूरस लावून घ्या. यामुळे केळी काळी पडत नाहीत. या कापांमध्ये व्हॅनिला, भाजलेले खोबरे आणि बदाम मिसळा.आता हे रायते तयार झाले. तुम्हाला हवे तसे खा. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करूनही खाता येईल. व्हॅनिला आइसक्रीम नसेल तर मग घाईघाईत दहीसुद्धा त्यात घालता येईल. आवडत असल्यास साखर घालू शकता.