18 September 2020

News Flash

टेस्टी टिफिन : केळ्याचे गोड काप

नाचणीच्या पिठात कोको पावडर, रवा आणि पाणी घालून त्याचे सरसरीत भज्यांच्या पिठासारखे पीठ तयार करावे.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

साहित्य :

साधारण पिकलेली केळी (फार मऊ झालेली नसावीत.), तूप, नाचणीचे पीठ, थोडी कोको पावडर, थोडा रवा, पाणी, पिठीसाखर.

कृती

नाचणीच्या पिठात कोको पावडर, रवा आणि पाणी घालून त्याचे सरसरीत भज्यांच्या पिठासारखे पीठ तयार करावे. आता केळ्याच्या गोल चकत्या करून किंवा आपल्याला आवडेल त्या आकारात ती केळी चिरून घ्यावीत. नाचणीच्या मिश्रणात घोळवून केळी तुपावर भाजावीत. कटलेट किंवा कापांप्रमाणे दोन्ही बाजूंनी लालसर भाजल्यावर काढावीत. लगेचच वरून पिठीसाखर पेरणी करावी. तुम्हाला कापांप्रमाणे परतून आवडत नसेल तर तुपात तळूनही घेता येईल. हे चविष्ट, पौष्टिक काप छोटय़ा डब्याला नक्कीच चालतील. कोको पावडर आवडत नसेल तर बोर्नव्हिटा, नटीला यापैकीही काही वापरू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:06 am

Web Title: banana sweet slices recipe
Next Stories
1 कलाकारी : टापटीप टेबल
2 स्वयंचलित घरासाठी
3 ऑफ द फिल्ड : मैदानात नसताना..
Just Now!
X